अवर्गिकृत

रस्त्यावर होल मग नो “टोल”..नो टोळधाड

Category:

ज्या दिवशी अशा स्रर्व प्रकारच्या “टोळधाडीतुन” महाराष्ट्राची जनता मुक्त होइल तो सुदिन म्हणावा..

अवर्गिकृत

खोट्या जामिनाला बसेल आळा ?

Category:

आपल्याकडे कायद्यानेही आरोपींना जामिनाचा अधिकार मान्य केला. परंतु, आरोपींकडून जामिनासाठी गैरमार्गांचा अवलंब केला जातो. पैसे घेऊन कोणालाही जामीन राहणार्‍या टोळ्या कार्यरत आहेत. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी जामीनाबाबतच्या विशेष अटी शिथिल करता येणार आहेत. मात्र, असा उपाय योजूनही खोट्या जामिनाची प्रकरणे होणारच नाहीत याची खात्री देणे अवघड आहे.

लेखसंग्रह

एका भिंतीच्या निमित्ताने पुन्हा इस्त्राइल – पॅलेस्टाईन संघर्ष

Category:

जेरुसलेममधील एका प्राचीन भिंतीवरून अरब आणि ज्यू यांच्यातील वातावरण तंग बनले आहे. ज्यू या भिंतीला पूजास्थान मानतात. मात्र, त्यांचा या भिंतीशी काही संबंध नाही असा दावा पॅलेस्टिनी अॅथॉरिटीच्या माहिती खात्याने आपल्या संकेतस्थळावर केला आहे. या विधानामुळे ज्यूंच्या भावना दुखावल्या आहेत. इस्राइल-अरब संघर्षात जेरुसलेमचे स्थान हा अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे. ताज्या वादाने त्याचे स्वरूप तीव्र झाले आहे.

रोईंगचा सुवर्णाध्याय

Category:

राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची भरघोस कमाई केल्यानंतर भारतीय खेळाडूंचे आशियाई स्पर्धेतील अपयश अधिकच उठून दिसत होते. त्यात सेनादलाच्या बजरंगलाल ताखर या जवानाने रोईंगच्या सिंगल्स स्कल प्रकारात सुवर्णपदक मिळवून देशाची प्रतिष्ठा राखली. राजस्थानमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या गावातून आलेल्या बजरंगलालने अपुर्‍या आणि दर्जाहीन सुविधांसह खडतर परिश्रम करून हे पदक मिळवले.

अवर्गिकृत

बबुआ, जनता भारी है !

Category:

काहीही न करता 15 वर्षे निवडून येण्याचा अनुभव लालूंच्या गाठीशी होता पण आपल्याला या जनतेनं कसं फसवलं याचं आश्चर्य त्यांच्या मनात मावेनासं झालं होतं. त्यातल्या त्यात आता घरी कसं जायचं याची चिंता त्यांना सतावत होती. कारण राबडीदेवींना दोन ठिकाणी उभं करून एकाही ठिकाणाहून निवडून आणू न शकल्याने घरात स्वागत कसं होतंय याची त्यांना काळजी लागून राहिली होती !