व्यक्ती-परिचय

मधुसूदन कालेलकर

Category:

 

नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. कालेलकरांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले. साहित्य हा त्यचा आवडता विषय होता तर नाटकाविषयी प्रेम होते. ‘अखेर जमलं’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट चांगलाच गाजला.

व्यक्ती-परिचय

सई परांजपे

Category:

 

नाटककार, लेखिका आणि उत्कृष्ट नाट्यसिने दिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सई परांजपे यांची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे बालसाहित्य लेखिका. एक वेळ प्रौढ साहित्य लिहिणे हे सहज शक्य असते मात्र बालसाहित्य हे तेवढेच अवघड काम. परंतु सई परांजपे हे अवघड काम आपल्या लेखणीद्वारे सहजतेने करून जातात आणि ते सहज असतं म्हणूनच सुंदर होतं.

व्यक्ती-परिचय

पद्मावती विष्णू गोळे

Category:

 

प्रेमभावने बरोबरच स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचे प्रतिबिंब ज्यांच्या कवितेत दिसते त्या पद्मावती विष्णू गोळे या प्रसिद्ध कवयित्री होत्या. १० जुलै १९१३ मध्ये त्यांचा पटवर्धन घराण्यात जन्म झाला. एम. ए. पर्यन्त शिक्षण झाल्यावर त्या पुण्यालाच वास्तव्यास होत्या. ‘प्रीति प्रथावर’ हा १९४७ मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला.

व्यक्ती-परिचय

गोपाळकृष्ण गोखले

Category:

 

भारतातील सनदशीर चळवळीचे प्रणेते म्हणून नाव घेतलं जातं ते गोपाळकृष्ण गोखले यांचं. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी कोकणातील चिपळूण तालुक्यातील कोतळुक या गावी झाला.

व्यक्ती-परिचय

डॉ. अरुणा ढेरे

Category:

 

मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोटी रोपं आपली वाढ हरवून बसतात, असं म्हणतात! पण केळीची जनरीतच वेगळी. तिच्या गाभ्यातूनच नवी केळ जन्मला येते, तिचंच रंगरूप घेऊन. अरुणा ढेरे यांचं अस्तित्व असं आहे. त्याही थेट आपल्या वडिलांचेच गुण घेऊन जन्माला आल्या आहेत.

व्यक्ती-परिचय

चिंतामण गणेश कोल्हटकर

Category:

 

विख्यात नट, वृत्तपत्रलेखक, आत्मचरित्रलेखक आणि म्हणून प्रसिद्ध असलेले मागील पिढीतले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व चितामणराव कोल्हटकर. यांचे मूळ घराणे नेवरे या रत्नागिरी जिल्ह्यातील गावचे. १२ मार्च १८९१ रोजी त्यांचा जन्म झाला.

व्यक्ती-परिचय

रा. श्री. जोग

Category:

 

साहित्य मीमांसक, कवी आणि एक विचारवंत म्हणून रा. श्री. जोगांची ओळख आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज या गावी १५ मे १९०३ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद बाजी जोग हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. रा. श्री. जोग यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले.

व्यक्ती-परिचय

विद्याधर गोखले

Category:

 

ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे.

विष्णू सखाराम खांडेकर
व्यक्ती-परिचय

विष्णू सखाराम खांडेकर

Category:

 

शब्दप्रभुत्व, कल्पनावैभव, कोटिबाजपणा, वास्तववादी, व्यामिश्र आणि प्रयोगशील लेखन करणारे महाराष्ट्रातले श्रेष्ठ कादंबरीकार, लेखक पद्मभूषण विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पहिले मराठी साहित्यिक.

व्यक्ती-परिचय

नाथ पै (बॅरिस्टर नाथ पै)

Category:

 

अतिशय विद्वान आणि गोरगरिबांविषयी आत्मीयता असलेले बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म वेंगुर्ले येथे दि. २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले.