हळदीचा गणपती

एका वेगळ्याच.. हटके पद्धतीने बनवलेला.. हा हळदीचा गणपती….



एका वेगळ्याच.. हटके पद्धतीने बनवलेला.. हा हळदीचा गणपती….

साहित्य

  1. हळद २५० ग्राम
  2. मैदा १०० ग्राम
  3. पिठी साखर २ टीस्पुन
  4. दुध ५० एम एल
  5. सजावटीचे साहीत्य

कृती :

प्रथम एका भांड्यात हळद पीठी साखर मैदा एकत्र करून घेणे. त्यात हळू हळू दुध टाकून चपातीच्या कणकेसारखी भिजवून घेणे. नतर त्या गोळ्याचे ३ सारखे भाग करावे.

प्रथम त्यावर शरीराचा भाग बसवून घ्यावा. नंतर दुसरा छोटा गोळा चेह-यासाठी त्यावर ठेवावा. त्या नंतर एका दोर्‍याने जानवं बनवून ते घाला.

नंतर तिस-या भागातून कान, पाय व सोंड बनवावे. नंतर गणपतीला सजवावे.

— सौ. वैशाली सुळे

Author