विटेवरी उभा माझा पांडुरंग

विटेवरी उभा माझा पांडुरंग ।
नाम घेता होई अंतरंग दंग ॥धृ॥

तुळशीच्या माळे गंध भक्तीचा ।
प्रेमाचा झरा वाहे अंतरीचा ॥१॥

दया-क्षमा घेऊनी चालावे पायी ।
विठ्ठल भेटे मग जीवाच्या ठायी ॥२॥

लोभ-मोह सारे टाकुनी द्यावे ।
हरीनाम घेता जीवन फुलावे ॥३॥

दास म्हणे, नामा अमृताचा साज ।
विठ्ठल चरणी ठेविला माझा भार ॥४॥

संतांच्या संगती रंगे हे जीवन ।
मुखी नाम घेता पावे समाधान ॥५॥

चंद्रभागा तीरी भावांचा मेळा ।
विठुराया भेटे प्रेमाचा सोहळा ॥६॥

एकादशी आली आनंद दारी ।
गजर होई मुखी "राम कृष्ण हरी" ॥७॥

आई-वडिलांची सेवा हीच पूजा ।
तेथेच दिसे माझा विठ्ठल राजा ॥८॥

भक्तीची वाट ही प्रेमाची खुण ।
विठ्ठल नामे हरपती सारे गुण ॥९॥

॥ राम कृष्ण हरी ॥
॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



विटेवरी उभा माझा पांडुरंग ।
नाम घेता होई अंतरंग दंग ॥धृ॥

तुळशीच्या माळे गंध भक्तीचा ।
प्रेमाचा झरा वाहे अंतरीचा ॥१॥

दया-क्षमा घेऊनी चालावे पायी ।
विठ्ठल भेटे मग जीवाच्या ठायी ॥२॥

लोभ-मोह सारे टाकुनी द्यावे ।
हरीनाम घेता जीवन फुलावे ॥३॥

दास म्हणे, नामा अमृताचा साज ।
विठ्ठल चरणी ठेविला माझा भार ॥४॥

संतांच्या संगती रंगे हे जीवन ।
मुखी नाम घेता पावे समाधान ॥५॥

चंद्रभागा तीरी भावांचा मेळा ।
विठुराया भेटे प्रेमाचा सोहळा ॥६॥

एकादशी आली आनंद दारी ।
गजर होई मुखी “राम कृष्ण हरी” ॥७॥

आई-वडिलांची सेवा हीच पूजा ।
तेथेच दिसे माझा विठ्ठल राजा ॥८॥

भक्तीची वाट ही प्रेमाची खुण ।
विठ्ठल नामे हरपती सारे गुण ॥९॥

॥ राम कृष्ण हरी ॥
॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author