‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल (Tin) हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’
हा अर्थ वाचल्यावर एक विचार आला ‘हल्ली बर्याच लोकांना डायबेटीस (मधुमेह) का आहे? २०-२५ वर्षांपूर्वी एवढा नव्हता. कारण पूर्वी कलही केलेली भांडी स्वयंपाकासाठी वापरली जात होती. तेव्हा स्टेनलेस स्टील, aluminum, कोटिंग केलेली भांडी नव्हती. पितळ्याच्या भांड्याला कलहीकरून वापरली जात होती.त्यामुळे कलहीच्या भांड्यातील स्वयंपाकामुळे नकळत कथिल धातू शरीराला मिळत होता. आता ती भांडी नसल्याने कथिल शरीराला मिळत नाही. म्हणून मी प्रयोग म्हणून कथिल आणले व स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन उकळले आणि ते पाणी पिऊ लागलो. चार दिवसात आम्हा घरातील सर्वांना संडासला साफ होऊ लागली. शरीरातील घन बाहेर फेकली जात आहे अशी जाणीव झाली.
Ø हे पाणी माझेकडे येणाऱ्या एका मुलीला दिले. तिलापण तसाच अनुभव आला आणि तिच्या पिंपल्स कमी झाल्या.
Ø एका बाईंचे पोट बेंबीखाली मोठे झाले होते.पोट कडक झाल्याने त्यांना खाली वाकता येत नव्हते. मी त्यांना कलहीच्या भांड्यात पाणी उकळून पिण्यास सांगितले. एक महिन्यांनी त्या भेटल्यावर मला म्हणाल्या, “मला संडासला साफ होते आहेच आणि पोट हि मऊ झाले आहे त्यामुळे मी आता पुढे वाकू शकते.” या बाईंची तीन मोठी ऑपरेशन्स झाली आहेत.
Ø माझ्या पत्नीला डायबेटीस आहे. हे पाणी प्यायला सुरवात केल्यापासून पत्नीच्या शौचात फरक पडलाच परंतु पूर्वी चार जिने चढताना तिसरा जिना चढल्यावर थांबत असे, आता न थांबता जिना चढते. मधुमेह चेक केल्यावर १०० ने कमी झाला.
गेली सतरा वर्षे मी पितळी पट्टीला दोन्ही बाजूला कल्हई करून लोकांना देत आहे व ती पट्टी स्टीलच्या पातेल्यात एक लिटर पाण्यात उकळून गार केलेले पाणी पिऊन त्यांना फायदा झाल्याचे अनेकांनी सांगीतले आहे.
(आमच्या पूर्वजांनी ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतःपैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?)
— अरविंद जोशी
BSc
९४२१९४८८९४