साहित्य - ललित

गुरूवंदना गायन गृप (आठवणींची मिसळ १४)

Category:

 

माझ्या साडूंनी (कै.रमेश वैद्य) निवृत्तीनंतर एक छान उपक्रम सुरू केला होता. ते स्वतः उत्तम गायक होते. ते गीतकारही होते. त्यांच्या अनेक रचना रेडीओच्या सुगम संगीतात अनेकदा चांगल्या चांगल्या गायक-गायिकांनी गायल्या. गायनावर त्यांचे खूप प्रेम होते. निवृत्तीनंतर ते इच्छूकांना गायन शिकवत असत. पण मी म्हणतो तो उपक्रम आगळावेगळा होता. दर गुरूवारी त्यांच्या घरी गाण्याची एक खास बैठक होई. त्यांत भाग घेणारे बहुतेक सर्वच जण निवृत्त झालेले होते. कांहीनी नोकरी पूर्ण केली होती तर कांही जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पण सर्वांच गायनावर प्रेम होतं. ह्या दोन-अडीच तासांच्या बैठकीत सर्वजण वीस वीस मिनिटे गात असत. जे थोडे कच्चे होते, तेही हळूहळू चांगले गाऊ लागत. कारण इतर सदस्य त्यांना उत्तेजन देत. ह्या बैठकींना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनांतखूप महत्त्वाचं स्थान मिळालं त्यांच्या या गृपला अकरा वर्षे पूर्ण झाली तेव्हां सर्वांनी मिळून एक गाण्याचा कार्यक्रमच सादर केला. दोनशेहून अधिक श्रोते त्या कार्यक्रमाला हजर होते. मला त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. काल कांही कागद चाळतांना मी त्या कार्यक्रमाच्या वेळी जे भाषण केले होते ते हाती आले. मी कांही मोठा वक्ता नाही की माझी भाषणे नोंदली जावीत. परंतु निदान तुम्हांला ते सादर करावं असं मनात आलं म्हणून इथे देत आहे.

साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५६ – नेली सेनगुप्ता

Category:

 

१९३३ सालच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अधक्ष्या होत्या. ब्रिटिश त्यावेळी एकही अधिवेशन पूर्णत्वास जाऊ नये असे बघत असे, जे अध्यक्ष नियुक्त होतील त्यांना अटक करणे, जी जागा निश्चित होईल तिथे निर्बंध लावणे, त्यातच श्रीमती नेली ह्यांच्याकडे कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षता आली कारण पूर्व नियोजित अध्यक्ष श्री मदन मोहन मालवीय ह्यांना अटक करण्यात आली. श्रीमती नेलीं च्या अध्यक्षीय भाषणा नंतर त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. ह्या अटक सत्राला त्या घाबरल्या नाहीत तर प्रत्येकवेळी तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी आपले सामाजिक जीवन तसेच चालू ठेवले.

लेखसंग्रह

बॉलीवूडची मैत्री

Category:

 

मैत्री ही फक्त गंमत मजा यासाठी न मर्यादीत रहाता, एकमेकांचा आधारवड बनू शकते, पडत्याला उभारी देउ शकते व एका ध्येयासाठी सर्वांना एकत्र आणू शकते याचे खूप सुंदर दर्शन या चित्रपटातून आपल्याला घडते. हा सिनेमा व्यवसायीक पातळीवर फार यशस्वी नसला तरी याने समिक्षक व चोखंदळ प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली होती. फरहान (अभिनयात पदार्पण), अर्जून रामपाल, ल्यूक केनी आणि पूरब कोहली यांनी चारही मित्रांची केमिस्ट्री इतकी सुंदर दाखवलीय की हे चारजण खरेच कॉलेजपासून मित्र होते असे वाटत राहते. मैत्रीत आवडत्या गोष्टी एकत्र येउन करायला स्टेटस, वेळ व वयाचे बंधन नसते हे सिद्ध करणारा चित्रपट होता.

साहित्य - ललित

पूर्णागिरी

Category:

 

पूर्णागिरी टणकपूरपासून २०-२१ कि.मी. अंतरावर आहे. दिल्लीहून टणकपूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. साधारण ३३० कि.मी. चे हे अंतर असून या प्रवासाला ९-१० तास लागतात. मोरादाबाद, रूद्रपूर-खतीमा असा हा मार्ग आहे. लखनौ, नैनीतालहूनही टणकपूरला जाता येते. टणकपूर हे बऱ्यापैकी मोठे गाव असून सर्व प्रवासी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पायथ्याशी असलेल्या या गावाचे मूळ नाव ‘ब्रह्मदेव.’