माँटेनिग्रो
शहरे आणि गावे

माँटेनिग्रो

Category:

 

माँटेनिग्रो हा बाल्कन प्रदेशातील एक देश आहे. माँटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला सर्बिया, पूर्वेला कोसोव्हो, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत. पॉडगोरिका ही माँटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

मलावी
शहरे आणि गावे

मलावी

Category:

 

मलावीचे प्रजासत्ताक हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील एक चिंचोळा भूपरिवेष्ठित देश आहे. १९६४ सालापर्यंत ब्रिटिश वसाहत असलेला हा देश न्यासालँड ह्या नावाने ओळखला जात असे. मलावीच्या उत्तर व पूर्वेला टांझानिया, पश्चिमेला झांबिया तर इतर दिशांना मोझांबिक हे देश आहेत. मलावीच्या पूर्वेस न्यासा हे आफ्रिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. लिलाँग्वे ही मलावीची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्लँटायर हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

मॉरिशस
शहरे आणि गावे

मॉरिशस

Category:

 

मॉरिशस हे बेट हिंदी महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. लगून्स, ज्वालामुखी आणि पाम झाडांनी व्यापलेल्या या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौहार्दामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे.

मेक्सिको
शहरे आणि गावे

मेक्सिको

Category:

 

मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस) हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वांत जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे. मेक्सिकोला लॅटिन अमेरिकेचा एक भाग समजले जाते.

प्राचीन नगरी ‘देवदिवाकान ‘ हिचे दोन हजार वर्षांपूर्वीच्या या महानगरीतील अवशेष आजही पहायला मिळतात.येथील चंद्रमंदिरात ललोक आणि केल्सल कोल्ला या देवतांची मंदिरे आहेत. केल्सल हा पवित्र पक्षी आणि कोल म्हणजे सर्प.पृथ्वी आणि आकाश यांच्या एकत्वाचे प्रतीक असलेली ही देवता. पुरोहितांचे प्रासाद तसेच नगरवासीयांची घरे याच परिसरात होती.उत्सवप्रसंगी लोक येथे एकत्र जमत असत.

मोरोक्को
शहरे आणि गावे

मोरोक्को

Category:

 

मोरोक्को, उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रदेशातील एक देश आहे. अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को हा फ्रान्स व स्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे.

मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला मोरोक्को उत्तर आफ्रिका भागातील एक बलाढ्य देश आहे. २०१४ साली मोरोक्कोची लोकसंख्या सुमारे ३.३८ कोटी होती. मोरोक्को आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. मोरोक्को अरब संघचा सदस्य आहे. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-७७ या गटांचा सदस्य आहे.

मलेशिया
शहरे आणि गावे

मलेशिया

Category:

 

मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्राने विभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत. थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत. हा देश विषुववृत्ताजवळ वसलेला असल्यामुळे येथील हवामान विषुववृत्तीय हवामानप्रकारानुसार आहे. मलेशियामध्ये वेस्टमिन्स्टर धर्तीवरील संसदीय लोकशाही असून सत्तेच्या सर्वोच्चपदी यांग दी-पेर्तुआन आगोंग (राजा) व कार्यकारी प्रमुखपदी पंतप्रधान असतात.