लेखसंग्रह

मराठी आडनाव – अणे

Category:

 

लोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.

बाबासाहेबांची पत्रकारिता
इ-पुस्तके

बाबासाहेबांची पत्रकारिता

Category:

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या ६५ पैकी सुमारे ३६ वर्षे पत्रकारिता केली. ते उच्च दर्जाचे पत्रकार होते. त्यांची पत्रकारिता मूकनायकच्या माध्यमातून आवाजहीनांचा आवाज बनून सुरू झाली आणि प्रबुध्द भारताच्या माध्यमातून प्रबुध्द भारत घडवण्याचे स्वप्न घेऊन संपली. मूकनायक ते प्रबुध्द भारत हा त्यांचा प्रवास विचार आणि संघर्ष या दोन्हींचा होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रे आसपासच्या घटनांची माहिती देणारे व्यासपीठ नव्हते. वसाहती काळातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनाशी वाटाघाटी करणाऱ्या त्या चळवळी होत्या, वंचितांचे आवाज होते.

या आवाजांचा परिणाम राजकीय सक्रियता आणि विविध संघटनांच्या विचारांमध्ये दिसून आला, ज्यामुळे विचारांचे स्फटिकीकरण झाले.

महाराष्ट्राच्या अरण्यातील महत्त्वाचे वृक्ष
इ-पुस्तके

महाराष्ट्राच्या अरण्यातील महत्त्वाचे वृक्ष

Category:

 

महाराष्ट्राच्या विविध अरण्यांमध्ये पसरलेल्या विविध वृक्षांची संपूर्ण माहिती देणारे हे एकमेव असे पुस्तक.

सुमारे ३२ वर्षे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन करुन १२ राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय जर्नल मध्ये संशोधन पेपर प्रसिद्ध करणारे अति वरिष्ठ संशोधक डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी या वृक्षांचा परिचय करुन दिला आहे.

गमती देशोदेशीच्या
इ-पुस्तके

गमती देशोदेशीच्या

Category:

 

जगातील सर्वात उंचावरून म्हणजे १६००० फूटांवरून धावणाऱ्या आगगाडीचा प्रवास’. तिबेट हा देश तसा भेट देण्यासाठी अवघड असल्याने खूपच वेगळे काहीतरी वाचल्याचा अनुभव येईल. नाझकाच्या अगम्य रेषा शाळेत शिकलेल्या भूगोलाची आठवण करून देतील. तर ‘इजिप्तमधले पिरॅमिडस व नाईलच प्रवास’, ‘उरोसची तरंगती बेटे’, ‘जपानचा साकुरा’, ‘स्वित्झर्लंडचे झरमॅट’, ‘दक्षिण आफ्रिकेतील ‘माबुला लॉज’ची वर्णने तिथे जाण्याची इच्छा मनात निर्माण करतील. दुबईसारख्या वाळवंटी प्रदेशातील बागा बघायला जाण्याचा नक्कीच मोह पाडतील व तिथे गेल्यावर ‘कशासाठी पोटासाठी’ मध्ये वर्णन केलेल्या कॉर्निशला भेट देण्याची आठवण नक्कीच येईल. ‘तांबोपाटा’ मधील व ‘वाईटामो केव्हज’ मधील वर्णन आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद देईल. चिनी लोकांची मुखवटा बदलण्याची कला खूपच वेगळी वाटण्याजोगी आहे. हा प्रवास कसा सुरू झाला, त्यातली ‘अडथळ्यांची शर्यत’ कशी संपली याचे वर्णन वाचून प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रवासाची आठवण आल्याखेरीज राहाणार नाही. सिंगापूरला गेल्यावर पहिले काही दिवस कसे गेले, तिथे रुळायला काय काय करावे लागले हेही ‘सिंगापूरच्या आठवणी’ वाचल्यावर काहीजणांना त्यांच्या बदल्यांमुळे आलेले अनुभव आठवायला लावतील.

या पुस्तकातील लेख हे कोणत्याही देशाच्या स्थळाच्या वा प्रवासाच्या वेळेला अनुसरून लिहिलेले नाहीत. सगळे लेख वेगवेगळे आहेत. त्यामुळे मागचा कोणताही संदर्भ मनात न धरता कधीही कोणताही लेख काढला तर तो नवीन वाटला पाहिजे. आपल्याला तसा तो वाटावा ही अपेक्षा

मी आणि ती – कथासंग्रह
इ-पुस्तके

मी आणि ती – कथासंग्रह

Category:

 

या पुस्तकातील प्रत्येक कथेत सतत मानवी मन डोकावताना दिसेल. कधी तिचे तर कधी त्याचे.
प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी तो किंवा ती येते किवा येत असते. तेव्हा मानवी मन काय आणि कसा विचार करते हे खरे तर शब्दात मांडता  येत नाही, तेच मी प्रत्येक वेळी कमीतकमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामधील कथा अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचल्या आहेत, त्यातील काही एकत्र या पुस्तकात देत आहे.
आणखी एक….  हे वाचल्यानंतर अनेकांचा…. म्हणजे स्त्री पुरुषाचा पहिला प्रश्न असतो तो, तुम्ही इतके आमच्या मनातले कसे ओळखता, तुमची अफेअर्स किती झाली आणि जी एफ किती.
मी काहीच उत्तर देत नाही ….
कशाला द्यायचे..