ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
शहरे आणि गावे

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

Category:

 

वाघ ही भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे. या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने व्याघ्र प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली. देशात २६ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तीन ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते विदर्भातच आहेत. यामध्ये मेळघाट, चंद्रपूरचा ताडोबा आणि नागपूरचा पेंच प्रकल्पाचा समावेश आहे. वाघांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी या प्रकल्पात काम केले जाते. पर्यटक मोठ्या संख्येने या प्रकल्पांना भेटी देतात.

 

ऐतिहासिक आणि धार्मिक अहमदनगर जिल्हा
शहरे आणि गावे

ऐतिहासिक आणि धार्मिक अहमदनगर जिल्हा

Category:

 

अहमदनगर आणि जिल्हा यांना इतिहासात स्थान आहे. सहकारक्षेत्र आणि साखर उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्यात चांदबिबीचा महाल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व विकास विभाग, भिंगार छावणी तसेच कारागृह आहे.

रांजणगावचा श्री महागणपती
शहरे आणि गावे

रांजणगावचा श्री महागणपती

Category:

 

मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याला लागूनच उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ठपूर्ण बांधणी केली आहे.

थेऊरचा श्री चिंतामणी
शहरे आणि गावे

थेऊरचा श्री चिंतामणी

Category:

 

थेऊरचा श्री चिंतामणी हासुद्धा अष्टविनायकातला एक गणपती. थेऊर हे पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.

 

थंड हवेचे ठिकाण माथेरान
शहरे आणि गावे

थंड हवेचे ठिकाण माथेरान

Category:

 

मुंबईपासून सर्वात जवळ असलेले आणि सहजपणे जाता येणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेले हे छोटेखानी गाव इंग्रजांच्या काळातील बंगल्यांनी नटलेले आहे.

 

ऐतिहासिक शहर अलिबाग
शहरे आणि गावे

ऐतिहासिक शहर अलिबाग

Category:

 

अलिबाग हे कोकणच्या किनारपट्टीवरील मुंबईपासून अतिशय जवळ असलेले ऐतिहासिक शहर आहे. मुंबईपासून जवळच असल्यामुळे येथे पर्यटकांची सतत रिघ लागलेली असते. सेकंड होम साठी अनेकजण आता अलिबागला पसंती देऊ लागले आहेत.

इगतपुरी – एक नयनरम्य हिल स्टेशन
शहरे आणि गावे

इगतपुरी – एक नयनरम्य हिल स्टेशन

Category:

 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे शहर महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. अनेक छोटे-मोठे धबधबे या ठिकाणी पहायला मिळतात.

ऑरेज सिटी – नागपूर
शहरे आणि गावे

ऑरेज सिटी – नागपूर

Category:

 

नागपूर हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री केवळ विदर्भ, राज्य, देशातच नव्हे तर जगात प्रसिध्द आहेत. येथील संत्र्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

देशातील पहिली सैनिकी शाळा सातारा शहरात
शहरे आणि गावे

देशातील पहिली सैनिकी शाळा सातारा शहरात

Category:

 

महाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्‍यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे.