दिनविशेष

जागतिक तंबाखूविरोधी दिन

Category:

 

तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून; एकटया मुंबईत हे प्रमाण 25.4 टक्के आहे. याशिवाय लहान मुलांतही धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्त प्रबोधनावर भर दिला जात आहे.

दिनविशेष

सिंधुदुर्ग जिल्हयाची निर्मिती

Category:

 

राजा भोज, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार व कदंब यांनी ज्या प्रदेशावर राजसत्ता गाजवली. तो प्रदेश म्हणजे कोकणच ह्रदय म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा. १ मे १९८१ रोजी राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून या सिंधुदुर्गची निर्मिती केली. सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणाचा दक्षिणेकडील भाग आहे. त्याची निर्मिती आधीच्या रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगूर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग अशा आठ तालुक्यांच्या एकत्रितकरणामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. 

दिनविशेष

युरोप मधील सिबलिंग डे

Category:

 

असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने सिबलिंग डे साजरा करण्याची कल्पना दिली. यासाठी त्यांनी सिबलिंग फाऊंडेशनची स्थापना केली, ज्याला अमेरिकन कॉंग्रेसने एकमताने मान्य दिली. यानंतर दरवर्षी १० एप्रिल रोजी सिबलिंग डे साजरा करण्यास सुरुवात झाली.असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली.

दिनविशेष

राष्ट्रीय वाढदिवस दिन

Category:

 

साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्यामध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं. शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्म वेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची. मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकाना अचूक तारीख सांगता यायची नाही. त्यामुले जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकचा एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे. पण गुरुजींना एझ्याट तारीख हवी असल्याने, पण ती काही पालकांना सांगता यायची नाही. मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ – दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली.

दिनविशेष

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यातील १४ फूट उंचीच्या पुतळ्याचे पासष्ठव्या वर्षांत पदार्पण

Category:

 

हा पुतळा कोणत्या शिल्पकाराला करायला द्यायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार समितीने ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार भगवंतराव गोरेगावकर आणि नानाभाई गोरेगावकर यांनी हा पुतळा घडवावा, असे करमरकर यांनी सुचविले. या पुतळ्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत यासाठी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा सल्ला घेण्यात आला होता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात ९६ हजार ६४३ रुपये खर्च आला होता.

दिनविशेष

पहिली ग्रँड प्रिक्समोटर रेसिंग

Category:

 

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे, चीन येथे हुमेन या गावी फार मोठ्या प्रमाणात ओपियमची (खसखस) शेती केली जात होती. याच ओपियमच्या फळांचा उपयोग मोठ्या प्रमाणात विविध ड्रग्ज (अंमली पदार्थ) बनविण्यासाठी व्हायचा. याच्या विरोधात लिन झीयू या व्यक्तीने खूप मोठे आंदोलन तेथे उभे करून यशस्वी केले. याच कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांच्या सन्मानार्थ २६ जून १९८९ पासून ‘जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा करण्यात येऊ लागला.

दिनविशेष

वेस्ट इंडिज संघाचा पहिला विश्वचषक विजय

Category:

 

क्लाइव्ह लॉईड व व्हिव्हियन रिचर्ड्स हे या सामन्याचे हिरो ठरले. प्रथम फलंदाजी करताना लॉईडने ८५ चेंडूंत १२ चौकार व दोन षटकार ठोकून १०२ धावा केल्या, तर रिचर्डसच्या अचूक फेकीने ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद झाले.

दिनविशेष

ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेट चीनला परत दिले

Category:

 

पहिल्या अफू युद्धानंतर (१८३९–४२) हाँगकाँग बेट नानकिंग तहान्वये ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले. १८६० च्या दुसऱ्या अफू युद्धानंतरच्या पीकिंगच्या (बीजिंग) तहात ठरल्याप्रमाणे कौलून द्वीप-कल्पाचा प्रदेश ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच १८९८ च्या परिषदेत नमूद केल्याप्रमाणे त्याच वर्षापासून न्यू टेरिटरी प्रांतासह २३५बेटे ब्रिटनला ९९ वर्षांच्या करारावर चीनकडून मिळाली. अशा प्रकारे ब्रिटनने चीनकडून संपूर्ण हाँगकाँग प्रदेश हस्तगत करून येथे आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.

दिनविशेष

जागतिक सायकल दिवस

Category:

 

हल्ली थोड्या अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमान वाढीचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीमध्ये तर वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी सम-विषमचा प्रयोग केला गेला. वाढत्या प्रदूषणाचा धोका वेळीच ओळखला नाही तर दिल्लीसारखी परिस्थिती आपल्या शहरातही उद्भवू शकते. त्यामुळे यावर उपाय करता येण्याजोगा एकच पर्याय आहे. तो म्हणजे शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात प्रवासासाठी सायकलचा वापर करणे. प्रदूषण रोखण्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठीही सायकल चालविणे उत्तम व्यायाम ठरतो.