युवा-विश्व

साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेले शिंपी‌ देविदास सौदागर

Category:

 

वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नसते. आयुष्यातील वास्तव नेहमीच आपल्याला खुणावत असते.कोणत्याही क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी जात, धर्म ,आर्थिक परिस्थिती, अपंगत्व कधीच आड येत नाही.व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मनात एक कोपरा छंदाचा असतो. आपले छंद ओळखता येणं व ते जोपासणं प्रत्येकाला जमेल असं नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या नादात जीवनामधील छंद सुप्त अवस्थेतच असतात. छंदाला वाव मिळाला नाही तर तो जोपासला जात नाही. आयुष्याच्या उत्तरार्धातच अनेकांचे छंद ओळखले गेले आहेत व बहरले आहेत. शाळेत न जाता किंवा शाळा अर्धवट सोडून अनेकांनी छंदाला वेळ दिला आणि त्यात त्यांनी यशोशिखर गाठले. अनेकांनी व्यवसाय करत करत छंदही जोपासले आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे साहित्य अकादमी प्राप्त देविदास सौदागर. वाचन व्यक्तिमत्व व आयुष्य समृद्ध करतं. वाचन तुम्हाला भरभरून देतं, ओळख देतं म्हणून वाचायलाच हवं.

युवा-विश्व

स्वप्नांना डोळ्यांची गरज नसते.

Category:

 

स्वप्नांना दृष्टिकोनाची गरज असते. दृष्टीहिनांनीही स्वप्न पाहून इतिहास घडविला आहे. भारतातील सगळ्यात तरुण उद्योजक श्रीकांत बोला २०२१ मध्ये फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीतही त्याला स्थान देण्यात आले आहे. ज्यांना वाटते की, शारीरिक अक्षमता एखाद्या व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते, त्यांच्यासाठी श्रीकांत बोला हे एक आदर्श उदाहरण आहे. श्रीकांत अंध असून ही‌ कोट्यवधींचा मालक झाला आहे. श्रीकांतने हे खरं करुन दाखवलं आहे की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचं यश गाठायला मदत करु शकतो.श्रीकांत बोला याचा जन्म ७ जुलै १९९२ रोजी झाला. आंध्र प्रदेशातील सीतारामपुरम येथील मछलीपट्टणम येथे जन्मलेला श्रीकांत आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अंध होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.

युवा-विश्व

एका बोटांचे कौशल्य

Category:

 

आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन‌ अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात.मालिनी चिब यांचे वन लिटील फिंगर हे पुस्तक असेच प्रेरणेची‌ पायवाट आहे. मालिनी चिब या बहुविकलांगता म्हणजे सेरेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त आहेत. असे असूनही या शारीरिक स्थितीशी झगडत शालेय शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षण या प्रवासामध्ये भारत आणि परदेशामध्ये घेतलेले अनुभव त्यांनी स्वत:च ‘वन लिटील फिंगर’ या पुस्तकातून मांडले आहेत. दिव्यांग व्यक्तींबाबत समाजामध्ये असणारे घोर अज्ञान, त्यातून निर्माण झालेली नकारात्मक वृत्ती, दिव्यांगांना समाजाकडून मिळणारी वागणूक, शासकीय यंत्रणांची उदासीनता, भारत व पाश्चिमात्य देशांमध्ये दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमधील जमीन अस्मानाचा फरक, यामुळे शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळवताना येणाऱ्या अपरिमित अडचणी यांसारख्या असंख्य गोष्टींचे दाहक चित्रण आणि त्याला मालिनीने केलेला यशस्वी सामना या पुस्तकात आहे.

युवा-विश्व

मी विजेता होणारच

Category:

 

नशीबावर अवलंबून अनेक जण आयुष्य व्यतीत करतात. माझ्या नशिबात नाही, मी करूच शकत नाही, मी होऊच शकत नाही. पण मनानं ठरवलं आणि अंमलबजावणी केली की यश आपलंच असतं.मनानं ठरवणारे अनेक असतात,उद्या पासून करु म्हणणारे तिथेच राहतात.

युवा-विश्व

आम्हाला बी थोडं घडवां की हो

Category:

 

अब्राहम लिंकन सांगून थकले की माझ्या मुलाला हे शिकवा माझ्या मुलाला ते शिकवा, त्यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र मुख्याध्यापकांच्या खोलीत फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त झालं आहे. फ्रेम मध्ये बंदिस्त केले की विचार ही बंदिस्त होतात कां?प्रेरणेच्या पायवाटा या धूळ खाण्यासाठी नसून त्याच्यावरून मार्गक्रमण करण्यासाठी असतात. शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवतात. संस्कार करणं शाळेची जबाबदारी आहे असं परिपत्रक तरी अजून निघालेले नाही कारण परिपत्रकाच्याच मार्गाने काही शाळा मार्गक्रमण करतात.

युवा-विश्व

जगायला श्वासाची नाही प्रेमाची गरज असते

Category:

 

संस्कारात वाढलेली पिढी आज निर्वात पोकळीत वाढत आहे.आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे. अशी गाणी आता इतिहासजमा झाली की काय?

फ्लॅट संस्कृतीत कोणी येतच नाही. टपाल किंवा खाद्यपदार्थ घेऊन येणारी माणसे, तीही ठरवून येतात. बोलावल्याशिवाय माणसाने येऊच नये अशी तजवीज माणसानी करून ठेवली आहे.नाच रे मोरा आंब्याच्या वनात ही गाणी मुलांनी कुठे अनुभवायची. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.पण दादाला आता सांगायची गरजच पडत नाही. दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ म्हणण्यासाठी दादी कुठे आहे?

युवा-विश्व

प्रेरणेचे उगमस्थान

Category:

 

“मेरे लिखने की प्रेरणा वहा से आती है जहाँ के लोग शोषित है मगर फिरभी हार नही मानते”- असे महाश्वेता देवी यांनी म्हटले आहे. संघर्ष सुद्धा प्रेरणेची बाब असू शकते. एखाद्याचा संघर्ष, दुःखं,वेदना पाहिल्यानंतर आपले दुःखं त्याच्यासमोर काहीच नाही हे समजून माणूस पुन्हा जोमाने उभा राहतो. योग्य वयात संघर्ष करावा लागला तर त्याचं एवढं अप्रूप नसतं पण बालपणीच एखादी मोठी जबाबदारी अंगावर पेलावी लागली तर ती विचार करायला लावते.. बालपण हे खेळण्याचे वय, आनंदी राहण्याचे वय पण त्या वयात पोटासाठी धोकादायक कसरती करून आपलं व कुटुंबाच पोट भरणं हे तो मुलगा शिकतो व त्याला पाहून आपण किती सुखी जीवन जगत आहोत, जराही कष्ट नाहीत याची जाणीव व्हायला लागते. जाणीव होणं म्हणजेच प्रेरणाची सुरुवात असते. नैराश्यात आशेचा किरण दिसणें ही सुद्धा प्रेरणाची पहाट असते. आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू शकत नाहीत व त्या कोवळ्या जीवांचा उपयोग अर्थाजनासाठी करतात तेंव्हा, आपल्या मुलांचा गृहपाठ करण्याची काही पालकांची कीव येते. आपल्या पाल्यांना कसली शिक्षा होऊ नये म्हणून काही पालक इतके हळवे होत असतील तर तो मुलगा कोणत्या संघर्षाला पुढे उभा राहील? अथक परिश्रम, जिद्द यांनी संघर्षावर मात करता येते. आमच्या मुलांना काही पालक संघर्ष करू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

युवा-विश्व

जे. कृष्णमुर्ती

Category:

 

काही माणसे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची पायवाट अदृश्य स्वरूपात असतेच. १२ मे १८९५ रोजी जे. कृष्णमुर्ती यांचा जन्म झाला. जे. कृष्णमूर्ती या थोर भारतीय तत्वज्ञाचा आपणास आता विसर पडलेला आहे. कृष्णमूर्तींचे विचार त्यांचे तत्वज्ञान हे नेहमीच समकालीन राहणार आहे. जे. कृष्णामूर्तींचे विचार मानव जातीला तारक ठरू शकतील असेच आहेत.भौतिक सुखाचा अतिरेकी हव्यास, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, चंगळवाद, भोगलोलुप्ता, जीवनशैली या गोष्टी मानव जातीला विनाशाकडे घेऊन जात आहेत. कृष्णमूर्तींनी आपले स्वतंत्र आणि स्वयंभू तत्वज्ञान जगाला दिले आणि एक सत्यदर्शी तत्वज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली.

युवा-विश्व

आयुष्य खूप सुंदर आहे.

Category:

 

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला ते जगता यायला हवं. केवळ जगणं महत्त्वाचं नाही तर जगताना आस्वाद घेता यायला हवा. जगायला जनावरं सुद्धा जगतात पण आपल्या जगण्यात एखादी गोष्ट नीट समजून घेतली तर आनंदामध्ये कित्येक पटीने वाढ होते. केवळ गुणांची टक्केवारी करिअर, मोबाईल टास्क असल्या गोष्टीमुळे सगळ्यांचे गुंतणं वाढलं आहे इतकं की स्वतःचे भान त्यांना राहत नाही. होण्यासाठी व आनंद घेण्यासाठी स्वतःचे भान हवंच. स्वतःचं आयुष्य संपवण्या इतपत भान हरवलं तर आयुष्य आनंदी व सुंदर कसं लागेल..

युवा-विश्व

ग्रेटा थनबर्ग

Category:

 

मोठा आवाज असलेली एक लहान मुलगी: ग्रेटा
एका मुलाला मी विचारले ग्रेटा कोण आहे माहित आहे कां? त्याने सांगितले की माहित नाही. आमच्या असंख्य मुलांना अनेक व्यक्तिमत्त्वाची ओळख नाही व ती त्यांना करूनही घ्यावीशी वाटत नाही हे दुर्दैव आहे. आजी आजोबा आज गोष्टी सांगण्यापूरतें सुद्धा उरलेले नाहीत. पूर्वीच्या काळी आजी आजोबांचं ऐकलं जायचं,आता नाही.आजी आजोबांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सुनावलं जातं, आमच्या मुलाचे पेंरेंटिंग आम्ही पाहून घेऊ, त्यामुळे मुलांना घडवण्याचं आज आई-वडीलावरच अवलंबून आहे, त्यांनीच घडवायला हवं.आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रेरणेच्या पायवाटेवरून जर प्रवास केला तर आयुष्याला एक दिशा मिळते.पायवाट नसली की माणसें भरकटतात.