अवर्गिकृत

तळापासून ढवळल्यानंतर

Category:

 

कोरोनोत्तर नाटक हे कोरोनावरची तात्कालिक प्रतिक्रिया स्वरूपाचे असण्याचा धोका आहे. ग्लोबलायझेशननंतर व्हायरस, डिस्क, डिलीट डेटा असे शब्द आले की झाली पोस्टग्लोबलायझेशन कविता असे वाटून कितीतरी कविता प्रसवल्या गेल्या. आता मास्क, सोशल डिस्टंसींग, सॅनेटायझर लॉकडाऊन यांचा मुक्तपणे वापर म्हणजे कोरोनोत्तर कलाकृती असा समज करून दिला जाऊ शकतो.

अवर्गिकृत

वोह सुबह कभी (जल्दी) तो आयेगी!

Category:

 

कोरोनामुळे जशी जगाची घडी विस्कटली, तशीच महाराष्ट्राच्या राजकारणाचीही अवस्था आहे. त्यामुळे जशी नवी आर्थिक घडी बसवावी लागेल, तशीच नवी व सुधारित राजकीय व्यवस्थाही उभी करावी लागेल. आशा इतकीच बाळगूया की, 2024 पर्यंत सकाळ नक्कीच उगवेल. येणाऱया नव्या प्रकाशाची कोवळी व आश्वासक किरणे या अस्थैर्याचा नायनाट करून नवे शाश्वत जग आपल्याला दाखवेल!

लेखसंग्रह

लढा सीमेचा ! लढा अस्मितेचा !! (भाग १०)

Category:

 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी माणसाने सर्वकांही केले. साम, दाम, दंड भोगला. बलिदान दिले, अनंत हालअपेष्टा सहन केल्या, कारावास भोगला. तेंव्हा कुठे दिल्लीश्वरांच्या मनात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा कांहीसा विचार येऊन गेला. त्यादृष्टीने कांही हालचाली होतात न होतात तोच प्रत्येक वेळी राष्ट्रीय आपत्ती आली नि सीमाप्रश्न मागे पडला.

लेखसंग्रह

चला नवीन सुरुवात करू या

Category:

 

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, सर्वांच्याच मनात आशेची नवीन किरणे घेऊन येणारा हा दिवस. 2021 बघता बघता काळाच्या गर्भात विरून गेले. पण जीवनात अनपेक्षित बदल घडवून आणणारे हे वर्ष नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारे ठरले. कडू, गोड, आंबट,.. आठवणींनी भरलेल्या ह्या वर्षाला राम राम करून आता नवीन वर्षाची सुरुवात करू या.

अवर्गिकृत

कोविड नंतरची ग्रंथालये

Category:

 

ऑनलाईन यंत्रणा फोफावत गेली तर शैक्षणिक ग्रंथालये, ग्रंथालय सेवक या नव्या यंत्रणेत उपयुक्त ठरतील का? टिकतील का? टिकायचे असेल तर ग्रंथालये ऑनलाईन पध्दतीत कशी आणता येतील यावर तज्ञांनी विचार मंथन करायला हवे.

अवर्गिकृत

दोज व्हू आर एट सी

Category:

 

पुर्वी जहाजं पोर्ट मध्ये गेली की दहा दहा दिवस थांबायची परंतु आता टाईम इज मनी, जहाज पोर्ट मध्ये कार्गो लोड किंवा डिस्चार्ज करण्यासाठी गेल्यावर चोवीस तासात बाहेर पडून पुढल्या सफरीवर निघतात. वेळेचे आणि त्याहीपेक्षा नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे लागते.

अवर्गिकृत

कड्याच्या टोकावर पत्रकारिता

Category:

 

बातम्या आणि जाहिराती यांच्यातले अंतर हळुहळू मिटत चालले आहे. कोविडनंतर तर जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या जातात. पेड न्यूज फक्त निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादीत राहिल्या नाहीत, तर त्या कायमच्याच मानगुटीवर बसल्या आहेत. त्यामुळे बातमी कुठली आणि जाहिरात कुठली हे वाचकांना कळेनासे झाले आहे.

अवर्गिकृत

निर्माता, वितरक विश्वास सरपोतदार

Category:

 

प्रथम त्यांनी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये रविवारी सकाळी इंग्रजी चित्रपटांचे खेळ (मॉर्निंग शो) लावायला सुरुवात केली. नंतर पुण्यातील दैनिकांत चित्रपटाच्या जाहिराती देण्यासाठी स्वतःची जाहिरात संस्था सुरु केली. त्याचबरोबर ‘अजय फिल्म डिस्ट्रिब्युटर’ ही वितरण संस्था काढून मराठी चित्रपटांचे वितरण सुरु केले.