लेखसंग्रह

ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर

Category:

 

ओल्या कचऱ्याचा संपूर्ण पुनर्वापर आपल्याला करता येईल. प्रत्येकाने आपल्या घरातल्या कचऱ्याचे सुरीने कापून त्याचे बारीक तुकडे केले अथवा पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक चटणी केली आणि ती घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यात टाकली तर कुंड्यांतील रोपे भराभर वाढतात.

लेखसंग्रह

मोठ्या प्रमाणावरील ओला कचरा

Category:

 

घरगुती स्तरावर जमा होणारा ओला कचरा हा घरटी अर्धा पाऊण किलो एवढाच असतो. पण भाजी मंडयात भाजीचा खूप कचरा जमा होतो. तो प्रत्येक मंडईमागे टन अर्धा टन एवढा सहज असतो.

लेखसंग्रह

कचऱ्याचे वर्गीकरण का करावे?

Category:

 

मुंबई महानगरपालिकेने ओला कचरा आणि कोरडा कचरा अशा दोन भागात रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे असा फतवा काही वर्षापूर्वीच काढला आणि जे कोणी असे करणार नाहीत त्यांना दंड करु असेही तेव्हा म्हटले होते. पण लोक आपण काढलेल्या फतव्याचे पालन करतात की नाही यावर देखरेखीची काही सोय केली नाही.

अवर्गिकृत

बोंगो, ढोलकी आणि मी

Category:

 

माझ्या वडिलांना तबल्याची आवड होती.तरुणपणी त्यांना ते वाजवायला शिकता नाही आले.उस्ताद थिरकवा हे त्यांचे आवडते होते. रेडिओवरील शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ते ऐकत असत.मी लहान असताना मला त्याची गोडी वाटत नव्हती.मी त्यांना मराठी किंवा हिंदी गाण्यांचे कार्यक्रम लावायला सांगायचो.

लेखसंग्रह

कचऱ्याचे व्यवस्थापन

Category:

 

एकूण कचऱ्यातील धूळ आणि इतर अंश सोडता जवळजवळ ८० ते ८५ टक्के भागावर परत काहीना काही प्रक्रिया करून तो पुन्हा वापरात आणता येतो. अगदी वर वर्णन केलेला ओला कचरासुद्धा. भाजी मंडईत रोज पडणारा भाज्या आणि खराब झालेल्या फळांचा भागही वापरात आणता येतो तर हॉटेलात उरलेले अन्नही खाण्याच्या नव्हे पण इतर प्रकारे उपयोगात आणता येते.

अवर्गिकृत

पत्रास कारण कि

Category:

 

हल्लीच्या पिढीला हा मायना कळणारच नाही, आणि त्यात त्यांची काही चुकी आहे असे मला तरी वाटत नाही. आजच्या इंटरनेटच्या जगात, व्हाट्सअँप, ट्विटर, इंस्टाग्राम, सिग्नल, स्नॅप-चॅट, वगैरे अँप्स वरून क्षणार्धात हव्या असलेल्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट, म्हणजे संपर्क करणे त्यांना सोपेच वाटणार.

अवर्गिकृत

तेजपुंज क्रांतीसुर्य वीर सावरकर

Category:

 

जुलै १९१० लंडनहून मोरिया नावाचे जहाज भारताकडे रवाना झाले त्यात भारताचे क्रांतीवीर कैदेत होते त्यांच्या भोवती कडेकोट पहारा होता. लंडन आणि मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या भोवती जहाजावर डोळयात तेल घालुन पहारा देत होते. त्यांच्या डोळयात धूळ फेकुन समुद्रामध्ये उडी मारून पोहत कुठल्यातरी विदेशी समुद्र किना-यावर पोहचण्याची योजना त्या क्रांतीवीराच्या मनामध्ये येत होती.

लेखसंग्रह

कचरा आणि त्याचे दुष्परिणाम

Category:

 

आवश्यक नसलेल्या निरुपयोगी वस्तू म्हणजे कचरा. आपल्या दैनंदिन वापरात आपल्याला नको असलेल्या टाचणीपासून मोठमोठया यंत्रसामग्रीपर्यंत आणि उष्टया अन्नापासून ते नासलेल्या फळफळावळीपर्यंत आणि भाजीपाल्यापर्यंतच्या वस्तू असतात.

लेखसंग्रह

ग्रोव्ह्युअर पद्धतीने छपाई

Category:

 

ग्रोव्ह्युअर छपाई पद्धतीत प्रतिमा कोऱ्या जागेपेक्षा खोलगट भागात असते. या खोलगट भागावरून छपाई करण्याच्या पद्धतीला इंटाग्लिओ पद्धत म्हणतात. प्रथम संगणकात प्रतिमा तयार करून एक पॉझिटिव्ह तयार केली जाते. एका तांब्याच्या सिलेंडरभोवती ही पॉझिटिव्ह गुंडाळून उघडयावर ठेवली जाते.

लेखसंग्रह

छपाईत रंगीत छायाचित्र थोडे हलल्यासारखे का वाटते?

Category:

 

रंगीत चित्र किंवा छायाचित्र हे मूळ चार रंगात छापले जाते. प्रथम छायाचित्र स्कॅनर उपकरणावर लावून ते संगणकावर घेतले जाते. पूर्ण पानातल्या चारपैकी प्रत्येक रंगाचा भाग निरनिराळा केला जातो. उदाहरणार्थ पान क्र. एकवरील लाल शीर्षक, जाहिरातीमधील लाल रंगाचा भाग, एखादे केशरी रंगाचे फूल असेल तर त्यातला पिवळ्या रंगाचा हिस्सा न घेता लाल रंग वगैरीची प्रतिमा, काळया रंगातली प्रामुख्याने मजकुरातली अक्षरे, छायाचित्रातल्या काळ्या रंगाचा हिस्सा घेऊन या प्रमाणे चार रंगाच्या चार प्रतिमा तयार करण्याला रंग विभागणी करणे म्हणतात.