अवर्गिकृत

संतसाहित्य समीक्षेतील धाडस

Category:

 

प्रा. डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी `संत एकनाथांचे अभंग, स्वरूप समीक्षा हा ग्रंथ लिहून मराठी संतसाहित्याच्या समीक्षेतील एक रिकामी जागा भरून काढण्याचे श्रेय अभ्यासाने प्राप्त केले आहे. रिकामी जागा भरली असे म्हणण्याचे कारण असे आहे, की अनेक अभ्यासकांनी नाथांच्या विविध साहित्यांवर साक्षेपी लिखाण केले आहे.

अवर्गिकृत

रणथंबोरच्या रानात – प्रवासवर्णन नव्हे

Category:

 

दीपक दलाल हे नाव इंग्रजी भाषेतील साहसकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी लक्षद्वीप, अंदमान, लडाख यासंबंधी साहसकथा लिहिल्या आहेत. राजस्थानातील रणथंबोर अभयारण्यासंबंधीच्या त्यांच्या साहसकथेचा अनुवाद श्री. पु. गोखले यांनी केला आहे. नावावरून हे प्रवासवर्णन वाटत असले, तरी प्रत्यक्षात ती साहसकथा आहे. गोखले यांनी इतक्या सहजतेने अनुवाद केला आहे, की हा अनुवाद आहे, हे सांगावे लागते.

अवर्गिकृत

केशर-सेंद्रियातून संजीवनी – (पुस्तक परिक्षण)

Category:

 

प्रयोगशील माणसे ही नेहमीच नव्याचा ध्यास घेत कार्यरत असतात. सुरेश वाघधरे हे नावसुद्धा शेतीत प्रयोग करणाऱयांमधील एक प्रमुख आहे. म्हणूनच त्यांच्या प्रयोगाची माहिती देणाऱया `केशर : सेंद्रियातून संजीवनी’ या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. या नव्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे प्रयोग केले प्रामुख्याने वीजनिर्मिती, शेण, गोमूत्र, स्लरी, खतनिर्मिती, सिंचनाची किफायतशीर पद्धत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून जे आपल्याला समजले ते दुसऱयाला सांगावे यानुसार शेतकऱयांसाठी माहिती त्यांनी अत्यंत खुलेपणाने उपलब्ध करून दिली आहे.

लेखसंग्रह

सामान्य नागरिकांचा प्रशासनामधील सहभाग

Category:

 

आज आपल्या राज्यामध्ये मध्ये जर राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष सारखेच नाकर्ते असतील तर केवळ “सिस्टीम” ला नावे ठेवून आणि “हे असेच चालणार ” असे सुस्कारे सोडून महाराष्ट्रा ची नक्कीच प्रगती होणार नाही.कुठेतरी आपण कार्यरत झाल्याशिवाय हे राज्य सुधारणार नाही.रस्त्या वर उतरून एक मेकांची डोकी फोडणे आणि मग जेल च्या वारया करणे याने काहीही सध्या होत नाही.घरबसल्या केवळ १० रुपये आणि थोडासा वेळ दिला तर सामान्य माणूस सुद्धा सामाजिक कार्य करू शकतो.तेव्हा मी महाराष्ट्रा तील जनतेला विनंती करीन कि माहितीचा अधिकार कायदा जाणून घ्या,त्याचा भरपूर वापर करा

लेखसंग्रह

फायदेशीर काय? धंद्याच्या सुरुवातीला भांडवल जास्त असणं का कमी असणं?

Category:

 

एकदा एक युवक एका उद्योगपतीला भेटला आणि त्यांना म्हणाला ‘मला धंदा करायचा आहे. पण माझा खिसा रिकामा आहे मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे’.तो उद्योगपती त्याला म्हणाला, ‘तुझा खिसा रिकामा आहे याची तू चिंता करुच नकोस. तुझं डोकं अथवा हृदय रिकामं असेल तर तो मात्र चिंतेचा विषय ठरेल.

लेखसंग्रह

ना धरि लोभ मनी

Category:

 

पैसे मिळविण्यासाठी कोणताही झटपट मार्ग नाही. त्यामुळे आंधळेपणाने कुठेही पसे गुंतवू नका, ती उधळपट्टी ठरेल. छोटी रक्कम खरेच दानधर्मासाठी वापरायची असेल तर त्यातुन आदिवासी मुलांसाठी दोन-तीन सायकली घ्या. त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी ५-६ किमी पायी चालावे लागते. सायकली मिळाल्यानंतरचा त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पहा. मग तुम्हाला खर्‍या दानधर्मातला आनंद अनुभवायला मिळेल. जीवनाचा आणि देण्याचा अर्थ समजावून घ्या.

लेखसंग्रह

तुम्ही बदल घडवू शकता !

Category:

 

नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचे महत्व सगळ्यांनी सांगूनही कित्येक लोक त्यापासून दूर राहिले. त्यातील काही लोक पूर्णपणे आत्मकेंद्रित होते हे गृहीत धरले तरी काही लोकांनी असा सूर काढला की काय करणार कोणीच लायक उमेदवार नव्हता म्हणून आम्हाला मतदान करता आले नाही. आता ही पळवाट म्हणून काढणारे किती व खरेच असा विचार करुन मत न देणारे किती हा संशोधनाचा विषय होईल. पण मग मत न देऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का? चांगले उमेदवार नाहित म्हणून मत द्यायचे नाही आणि मग पुन्हा लोकांशी देणे घेणे नसण्यार्‍या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवायची हेच चालू ठेवायचे का? माझ्या ‘लढा किंवा झोप काढा ’ या लेखात म्हटल्याप्रमाणे हाही एक स्वातंत्र्यलढाच आहे. या लेखात आपण दुसर्‍या पर्यायाचा विचार करू.

लेखसंग्रह

लढा (किंवा झोप काढा)

Category:

 

मुंबईवर मागच्या वर्षी हल्ला झाला तेव्हा काही लोकांनी मेणबत्त्या लावुन राजकारण्यांच्या वरचा राग व्यक्त केला होता. आताही निवडणुका आलेल्या आहेत आणि रणधुमाळी सुरु झालेली आहे. काही लोक आतादेखील संताप व्यक्त करीत आहेत. काही ठिकाणी

तर मतदानच करु नये अशी मते व्यक्त होत आहेत. पण खरे पाहता आपणच याला जबाबदार आहोत. आणि मतदान न करण्याविषयी म्हणाल तर तेच तर राजकारण्यांना हवे आहे. म्हणजे त्यांनी मिंधे केलेले लोक वा त्यांचे कमिटेड कार्यकर्ते हेच फक्त मतदानाला बाहेर पडतील.

लेखसंग्रह

छत्रपति शिवाजी महाराज यांचे मूळ छायाचित्र

Category:

 

मास्को येथील संग्रहालयामध्ये असलेले छत्रपति शिवाजी महाराज यांचे हे मूळ छायाचित्र आहे असे म्हणतात, त्यांना समोर बसवून हे काढले आहे व त्यावर त्यांचे हस्ताक्षर पण आहे.