अवर्गिकृत

सोनीयांही एक दिवस “जय महाराष्ट्र” म्हणतील.

Category:

 

मी ब-याच दिवसापासुन विवीध प्रकारचे लिखान करतो, आपल्यालाही बरे वाटल्यास प्रसीध्द करावे.

अवर्गिकृत

चार सीमचा मोबाईल फोन 4 SIM Mobile

Category:

 

आत्तापर्यंत तुम्ही एक, दोन व जास्तीतजास्त तीन सिमकार्डचे मोबाईल फोन पहिले असतील.पण आता ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल असा चार सीमचा एक मोबाईल फोन आता मार्केटमध्ये आला आहे. GFive या चायनाच्या कंपनीने GF 90 4 SIM नावाने हा मोबाईल मार्केटमध्ये उतरवला आहे. हा केवळ चार सिमचा मोबाईल नसून त्यात उत्तम मल्टीमिडीया फिचर्सही समाविष्ट केलेली आहेत.

अवर्गिकृत

वाहिन्यांना हवी आचारसंहिता

Category:

 

‘बिग बॉस’ मधील उत्तान, अश्लील चाळे आणि ‘राखी का इन्साफ’ मधील असभ्य, मानहानीकारक वक्तव्ये यामुळे या दोन्ही कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी पुढे आली. त्या निमित्ताने वाहिन्यांवर अंकुश ठेवण्याचाही मुद्दा ऐरणीवर आला. खरे तर वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या प्रसारणावर कायद्याने अंकुश ठेवायला हवा किंवा त्या संदर्भात आचारसंहिता तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.

लेखसंग्रह

“मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी”(Mobile Number Portability)

Category:

 

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी’ उर्फ (Mobile Number Portability)आता लवकरच येत आहे. त्याच्या प्रसूतीकळा काही कंपन्यांना यायला ही लागल्या आहेत. तेव्हा याचा जन्म झाल्याची वार्ता (हायटेक भाषेत ‘फ्लॅश न्यूज, ब्रेकिंग न्यूज’ म्हणा हवं तर) कधीही येऊ शकते.

अवर्गिकृत

भ्रष्टाचारविरोधात भाजप नापास

Category:

 

देशात सध्या भ्रष्टाचारविरोधी वारे वाहत आहेत. ए. राजा, कलमाडी आणि अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई झाल्याने भ्रष्टाचार्‍यांना तो दडवणे अवघड बनत चालल्याचा इशारा मिळाला. पण, काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणार्‍या भाजपने कर्नाटकचे भ्रष्ट मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची पाठराखण केल्याने भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई निर्णायक ठरणार नाही असा संदेश जात आहे.

अवर्गिकृत

बीएसएनएलची प्यारी जोडी स्कीम

Category:

 

नुकतीच बीएसएनएलची ‘प्यारी जोडी’ ही स्कीम आली आहे. याअंतर्गत लँडलाईन असणर्‍या ग्राहकांना एक प्रीपेड किंवा पोस्टपेड सिमकार्ड मोफत दिले जात आहे. या सीमकार्डवरून ग्राहकाकडे असलेल्या लँडलाईन फोनवर अमर्यादीत कॉल्स मोफत केले जाऊ शकतात. ही यातील एकमेव जमेची बाजू आहे.

अवर्गिकृत

प्रतिदहशतवादाचे उभे आव्हान

Category:

 

मुंबईवरील 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपीला अजून शिक्षा झालेली नाही. एवढेच नव्हे तर 1993 च्या स्फोटातील आरोपींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब न झाल्याने ते जामिनावर सुटून मोकाट फिरत आहेत. वाढत्या दहशतवादाला जनतेची उदासिनता, न्याययंत्रणेतील विलंब, माध्यमांचा उथळपणा या बाबी कारणीभूत आहेत. आता तर वाढता प्रतिदहशतवाद हीसुद्धा चिंताजनक बाब ठरत आहे.