c-oldsite
जे का रंजले-गांजले…
Category:
अवर्गिकृतआपल्या मराठी मुलखात निराधार व्यक्तींची अशी व्यथा पुढारलेल्या समाजरचनेला निश्चितच शोभनीय ठरणारी बाब नाही.
अव्यक्त असलेला उलटा वटवृक्ष
Category:
लेखसंग्रहत्यासाठी इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए. सी. भक्तीवेदांत प्रभुपाद यांची अध्यात्मावरील अनेक ग्रंथ अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत
भेसळीच्या तपासणीतही उदासिनता
Category:
अवर्गिकृतअलीकडे विविध पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार वाढीस लागले आहेत. ऐन दिवाळीत दूध आणि खव्यातील मोठ्या प्रमाणावरील भेसळ उघड झाल्याने खळबळ माजली होती. त्यामुळे भेसळ करणार्यांविरूद्ध कठोर कारवाई व्हावी या मागणीने जोर धरला. वास्तविक अशा कारवाईसाठी भेसळयुक्त पदार्थाच्या तपासणीचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. असे असताना राज्यातील 11 अन्न तपासणी प्रयोगशाळा रिक्त पदे न भरल्याने बंद असल्याचे उघड झाले आहे.
हम दो… हमारा कोई नही
Category:
अवर्गिकृतकारकिर्दीबद्दलच्या महत्त्वाकांक्षेमुळे बरेचदा स्त्रिया कौटुंबिक सुखाशी तडजोड करतात. गर्भावस्था आणि बाळंतपण यासाठी आता मोठ्या शहरांमधील उच्चपदस्थ महिलांकडे वेळ राहिलेला नाही. त्यामुळे आजकाल बरीच जोडपी बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतात. नवी जबाबदारी अंगावर घेऊन कारकिर्दीशी तडजोड करणे त्यांना मान्य नसते. जोडीदाराबरोबर स्वतंत्र आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असतो.
“रग्बी” रुजतोय
Category:
लेखसंग्रहरग्बी हा खेळ पाश्चात्य देशांमध्ये खेळला जातो. या खेळात शक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. हा खेळ हळूहळू भारतातही रुजत असून राज्य आणि देशपातळीवरील विविध स्पर्धांमधून गुणी खेळाडू पुढे येत आहेत. अनेक बाबतीत अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य राखणार्या या खेळासाठी शक्ती, कौशल्ये आणि चापल्य यांचा त्रिवेणी संगम आवश्यक असतो. आदित्य पागे या उदयोन्मुख रग्बी खेळाडूकडून समोर आलेली माहिती.
व्यथा वार्धक्याची
Category:
अवर्गिकृतव्यथा वार्धक्याची
नको नको ते लाजिरवाणे जगणे आता आम्हाला
अर्थही नसतो असल्या भेकड दुबळ्या जीवनाला
दुखणे खुपणे चालू असते त्याची कटकट सगळ्यांना
असुनी अडचण सदा वाटते घरच्या सर्वही लोकांना
गरजे पुरते जवळी येतील ठाऊक आहे आम्हाला
प्रेमाचा तिथ शब्दही नसतो वा मायेचा ओलावा
आम्ही भुकेले प्रेमासाठी नातवंडे ती भूक पुरविती
अंधारातील प्रकाश तारे उजळविति जीवन गगनाला
अनिल आपटे
सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग – १
Category:
अवर्गिकृतआजकाल प्रत्येक कॉम्पुटर वापरणार्या व्यक्तीला सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? असा जटील प्रश्न नेहमी पडत असतो. तसं ते काही कठीण काम नाही, पण असा पासवर्ड बनविण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी मात्र अवश्य घेतली पाहिजे.
नराधमांचे क्रौर्य
Category:
अवर्गिकृतहे कोठून येतात, त्यांच्यार ही वेळ कोणामुळे आली, त्यांची तस्करी कोण करते, असे सारे प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत असून समाज शिक्षणाअभावी केवळ स्वार्थापायी लहान मुलांची तस्करी करणार्या या लोकांमुळे सामाजिक स्वास्थ्य खराब होत आहे.