अवर्गिकृत

मराठी शाळांच्या प्रगतीसाठी नव्या प्रयोगाची आवश्यकता..!

Category:

 

२१ व्या शतकात जागतिक महाशक्ती बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात, शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन प्रयोगाची गरज नाही काय ? वाढत्या लोकसंख्येबरोबर शासनासामोरील समस्यांचे डोंगर वाढत आहे. गाव तिथे शाळा, हे धोरण असल्याने बऱ्याच शाळांत विध्यार्थी संख्या नाममात्र दिसते. १० ते ५० पटसंख्या असलेल्या शाळांचे प्रमाण भरपूर आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार ६० पटसंख्ये पर्यंत दोन शिक्षक, हे धोरण असले तरी इयत्ता ४ आणि शिक्षक २ ह्याचा कोठेही मेळ बसत नाही.

अवर्गिकृत

अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण – गावाकडची अमेरिका

Category:

 

सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्‍या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल.

अवर्गिकृत

महाराष्ट्रातील हेमांडपंती देवालये

Category:

 

हेमांडपंती देवालय म्हटले की ते अगदी साधे, लहानसे, आणि ओबडधोबड बांधणीचे असते. असा सर्वसाधारणपणे समज आहे. परंतु सिन्नर किंवा अंबरनाथचे भरीव मंदिर पाहिल्यावर भ्रमनिवास व्हायला वेळ लागणार नाही.

अवर्गिकृत

धारावीचा काळा किल्ला

Category:

 

धारावी मधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी अगदी जगप्रसिद्ध झालेली आहे. धारावीच्या या लहानशा किल्ल्याला काळा किल्ला म्हणतात. स्थानिक लोकांमधे तो काळा किल्ला अथवा ब्लॅक फोर्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे.

अवर्गिकृत

रत्नागिरीचा ऐतिहासिक ठेवा

Category:

 

रत्नागिरी जिल्ह्याची भटकंती इतिहासप्रेमींसाठी पर्वणीच असते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधून हिंडतांना इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळतात…छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आठवतो…त्याचबरोबर अनेक गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंना भेट देतांना स्थापत्यकलेचे अद्भूत नमुने न्याहाळता येतात. दापोली परिसरात फिरतांना कोकणचे अस्सल सौंदर्यही डोळ्यास पडते. म्हणूनच पर्यटकांचा या परिसराकडे जास्त ओढा असतो.

अवर्गिकृत

किल्ले अंकाई टंकाई

Category:

 

अंकाई-टंकाई चा उल्लेख काही ठिकाणी अणकाई – टणकाई असाही केला जातो. हे जोडकिल्ले अजिंठा-सातमाळ रांगेत वसलेले आहेत. अंकाई जवळ ही रांग काहीशी तुटलेली आहे. या तुटलेल्या भागामधूनच गाडीरस्ता आणि रेल्वे मार्ग जातो.

अवर्गिकृत

चिपळूणचा गेवळकोट

Category:

 

चिपळूणपासून साधारण ४ कि.मी. अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिनही बाजुनी वस्तीने घेरलेला आहे.

अवर्गिकृत

नाशिकचे मोदकेश्वर गणेश मंदिर

Category:

 

नाशिक जिल्हा हा धार्मिक पर्ययटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा जिल्हा मानला जातो. नाशिक शहरात असंख्य मंदिर आहेत. त्यापैकीच एक प्रसिध्द मंदिर म्हणजे मोदकेश्वर गणेश मंदिर. मोदकाच्या आकारातील हे मंदिर नाशिकरांचे श्रध्दास्थान आहे.

लेखसंग्रह

अशीही बनवाबनवी

Category:

 

ठाणे शहराचे महापालिका आयुक्त आर ए राजीव यांनी ठाणे खाडी किनाऱ्याच्या पूर्वेला १०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात नवीन शहर बसवण्याचा निर्णय नुकताच जाहिर केला. या निर्णयाबाबत ज्येष्ठ पत्रकार श्री संदीप प्रधान यांनी आयुक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी  बातमी लिहिली. ही बातमी सोशल नेटवर्कींगच्या आणि इ-मेल्सच्या माध्यमातून शेकडो वाचकांपर्यंत पोहोचली. मराठीसृष्टीच्या वाचकांनाही ही माहिती विनासायास मिळावी या एकाच हेतूने ही बातमी येथे पुनर्प्रकाशित करत आहोत.