अवर्गिकृत

बधिर शांतता

Category:

 

मुंबईत बोरिवली पश्चिमेला राहणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य सिनेमाभक्तांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एकेकाळी फुलांनी सजवलेला हाऊसफुल्लचा बोर्ड दिमाखात मिरवणारी आमची चित्रमंदिरे म्हणजेच अजंठा, डायमंड आणि जया सिनेमा ह्यावर काहीतरी लिहूया असा विचार गेले अनेक महिने डोक्यात फिरत होता. मात्र त्या लिखाणासाठी कुठलीच मूलभूत आणि जुजबी माहिती ना माझ्याजवळ होती ना गूगलबाबांकडेदेखील. नुकताच बोरिवलीला जाण्याचा योग जुळून आला होता.

लेखसंग्रह

समर्थांनी विचारांची क्रांती घडविली

Category:

 

बालपणी धाडशी असलेले समर्थ आठव्या वर्षी ‘चिंता करितो विश्वाची’ असे आईस म्हणाले. पुढे त्यांनी संसाराचा मोहत्याग करून तापी नदीकाठी बारा वर्ष श्री ‘राम मंत्र आणि गायत्री पुरश्चरण’ कठोर तपस्या करून, आसेतु हिमाचल पायी प्रवास केला असे सांगितले.

अवर्गिकृत

आई ती आईच – भाग तीन

Category:

 

२००९ साली माझ्या फार्मवर पहिली गाय आणली गेली. नंदिनी तिचे नांव. खिलार जातीची , देखण्या लांब शिंगांची, शुभ्र पांढरी , उंच , निळ्या डोळ्यांची आणि फार डौलदार. फार्मची शान होती ती.

लेखसंग्रह

बार्सिलोनातले beggars…

Category:

 

बार्सिलोना तसं म्हणाल तर मुंबई सारखंच खूप मोठ्ठ आणि पसरलेलं Spain मधील एक शहर! त्यामुळे सहाजिकच अफाट लोकसंख्या आणि त्यातूनच निर्माण झालेली उत्कृष्ठ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transportation)!

लेखसंग्रह

मनातलं मनापासून – “३८ कृष्ण व्हिला”

Category:

 

काही काही नाटकं ही नाटकाचं नाव बघून, निर्मिती संस्था ,दिग्दर्शक कलाकार बघून लगेच बघावी अशी वाटतात….. असच एक नाटक म्हणजे “३८ कृष्ण व्हिला”. नाटकाचं नाव बघूनच वाटत की, हे एक मर्डर मिस्टरी ,किंवा गूढ अनामिक रहस्यमय असं असावं,पण आपल्याला पहिला धक्का तिथेच बसतो….हे नाटकात रहस्य आहे, धक्का आहे, काय घडत असेल या व्हीला मधे याची सतत उत्कंठा निर्माण करणार आहे..

अवर्गिकृत

माझे स्वयंपाकघर

Category:

 

तीस एक वर्षापूर्वीचा काळ… तेव्हा खेडेगावात स्वयंपाक चुलीवरती किंवा स्टोव्ह वर केला जायचा. चुलीवरची खरपूस भाकरी, वांग्यांचे भरीत या गोष्टी ऐकण्यापुरत्या बऱ्या.

लेखसंग्रह

रेझान्ग्लाची लढाई

Category:

 

हि गोष्ट आहे १९६२ च्या चीनशी झालेल्या युद्धात, लडाखच्या रेझान्ग्ला खिंडीत शूर भारतीय सैनिकांनी केलेल्या, एका लढाईची. ही लढाई चुशुल जवळच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये लढली गेली.

लेखसंग्रह

टेडी डे

Category:

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट ह्यांचे टोपण नांव आहे टेडी.. एकदा ते शिकारीला गेले असतांना जखमी अस्वलाला पाहून त्यांचे मन द्रवले , त्यांनी त्याची शिकार केली नाही.त्यांच्या या उदारतेचे चित्र एका व्यंगचित्रकाराने , एका वृत्तपत्रात रेखाटले. ते पाहून एका उद्योगपतीच्या पत्नीला ,खेळण्यातले अस्वल बनवण्याची कल्पना सुचली .म्हणून त्या अस्वलाला टेडी हे नांव देऊन ते राष्ट्रपतींना समर्पित करण्याची परवानगी त्या उद्योग पतींनी मागितली आणि असा या टेडी बेयरचा जन्म २० व्या शतकांत झाला.

लेखसंग्रह

हांतू इस्त्री बारू

Category:

 

आमच्या जहाजाच्या बाजूला एक इंडोनेशियन जहाज उभे होते. समुद्रात एका जेट्टीच्या दोन बाजूंना दोन्ही जहाजे बांधली होती. दोन्ही जहाजांच्या मध्ये सत्तर एंशी मीटरचे अंतर असेल. आमच्या जहाजातील क्रूड ऑइल कार्गो बाजूच्या जहाजात ट्रान्सफर केला जात होता.