लेखसंग्रह

दोन महान व्यक्तिमत्वं – दोघेही बॅरिस्टर – सावरकर आणि आंबेडकर

Category:

 

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही एकाच दशकातील दोन महान व्यक्तिमत्वं. दोघेही बॅरिस्टर. दोघेही उत्तम वक्ते, प्रतिभावान लेखक. दोघांकडे नेतृत्वगुण होते, प्रभावी वक्तृत्व होतं.

लेखसंग्रह

रंग बदलणारं झाड – करू

Category:

 

रंग बदलण्याची गोष्ट  निघाली  तर सरड्याचे नाव पहीले घेतले जाते  मात्र  नागपूर जिल्ह्यातील  वैनगंगा नदीकाठच्या आभोरा जंगलातील खोलेश्वर(कोलेश्वर) पहाडावर एक असं झाड पाहावयास मिळतं की ते बदलत्या रूतूनुसार आपला रंग बदलतं. ह्या जादूई वृक्षास परीसरात करू चे झाड म्हणून ओळखल्या जाते.

लेखसंग्रह

ऑल इज नॉट वेल !

Category:

 

सरकार, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा आता घासून घासून गुळगुळीत झाला आहे. देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवून लाचखोरी करणाऱ्यावर वचक बसावा यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली, विविध कायदे आणि नियम आणल्या गेले. ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ हा मुदा जनआंदोलनातून बहुतांश राजकीय पक्षांच्या मॅनिफेस्टो मध्ये आला. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने काहींना ‘महात्मा’ बनविले, तर काहींसाठी सत्तेच्या राजकारणाची दारे उघडी केली. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी निवडणुका जिंकल्या. मात्र, प्रशासन भ्रष्टाचारमुक्त असावे, ही जनसामन्यांची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही.

लेखसंग्रह

जगन्नाथपंडितकृत गंगालहरी – स्वैर मराठी भावानुवाद भाग १

Category:

 

भाग १ – गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील  मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे.

लेखसंग्रह

हैद्राबाद एन्काऊंटर प्रकरण

Category:

 

देशात आज पर्यंत लाखो गुन्हे झाले, मग त्या तुलनेत पोलिसांनी किती जणांचे एन्काऊंटर केले..? टक्केवारीत आकडा उलगडला तर ते प्रमाण 0.01 च्या आसपास येईल. गुन्हा करूनसुद्धा न्यायालयातून निर्दोष सुटणाऱ्यांचं प्रमाण काढलं तर तो आकडा ‘आभाळा’ एवढा भासेल. Extra judicial killing ला माझा पाठिंबा आहे असं बिलकुल नाही, मी फक्त मिडियापुढं बडबडणाऱ्या बुद्धिवंतांच्या सत्येतला विरोधाभास दाखवतोय.

अवर्गिकृत

व्यवस्थांना अंतर्मुख करणारा (अ)’न्याय”?

Category:

 

बलात्कार आणि खुनासारखं नृशंस अमानवी कृत्य करणाऱया बेदरकार गुन्हेगारांना असाच धडा शिकवला जावा, कोर्ट कचेरयांच्या भानगडीत वेळ न दवडता आशा प्रकरणातील आरोपींना अशीच शिक्षा दिली जावी, ह्या जनभावना देशाच्या विविध स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसरीकडे ह्या घटनेला अयोग्य मानणाराही एक वर्ग आहे. कायद्याच्या राज्यात पोलिसांनी अशाप्रकारे कायदा हातात घेणे हे या वर्गाला रुचलेले नाही. अर्थात, पोलिसांच्या समर्थनातील आवाजाच्या समोर आज त्यांचा आवाज काहीसा क्षीण आहे.

लेखसंग्रह

ई-नाम’ प्रणाली शेतकरी हिताची ठरेल का?

Category:

 

शेतकरी केंद्रिबदू मानून बाजार समित्यांची रचना करण्यात आली. मात्र, ह्या समित्या आज राजकारणाचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण करणे जरुरीचे म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणलेली इ -नाम प्रणाली बाजारपेठ म्हणून शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरु शकेल काय? हा एक चिंतनीय प्रश्न आहे.

अवर्गिकृत

कार्तेगेना

Category:

 

पहाटे पहाटे जहाज जेट्टी वर बांधत असताना इंजिनच्या मुव्हमेंट जाणवल्या होत्या. जहाज पुढे मागे करताना इंजिन चालू बंद होण्याचा आवाज आणि व्हायब्रेशन मुळे कितीही झोपेत असलो तरी जाग आल्याशिवाय राहात नाही . तसही रात्री लवकर झोपल्यामुळे सकाळी साडे पाच वाजता जाग आली होती.

अवर्गिकृत

अडव्हान्स, रिटार्ड

Category:

 

ज्या दिवशी क्लॉक अडव्हान्स होते त्या दिवशी सर्व इंजिनियर आणि इंजिन क्रृ ला एक तास लवकर सुट्टी मिळते कारण जहाज नेहमी खोल समुद्रात असते पण डेक ऑफिसर चार चार तासाची वॉच ड्युटी करत असल्याने त्यांना वीस वीस मिनिटे वॉच वर लवकर यावे लागते. जेव्हा क्लॉक रिटार्ड म्हणजे एक तास मागे केले जाते त्या दिवशी रात्री घड्याळाचे काटे उलटे फिरवले जातात. रात्री बारा वाजता काटे फिरवून अकरा वाजेवले जातात. असे बोलतात

लेखसंग्रह

एनआरसी’ ची अवघड वाट !

Category:

 

देशातील सगळ्या नागरिकांची नेमकी ओळख पटवणे, त्यांची वर्गवारी करणे, त्यातील बेकायदा रहिवाशांना शोधून काढणे ही प्रक्रिया अंत्यत्न किचकट आणि वेळखाऊ ठरणार हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यासाठी स्पष्ट धोरण असायला हवे. देशातील आभारतीयांचा शोध घेऊन त्यांचं काय करायचं? याचीही धोरणनिश्चिती झाली पाहिजे. स्पष्ट धोरणाशिवाय प्रक्रियेला सुरवात झाली तर ती वाट फार बिकट राहील, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे…!