अवर्गिकृत

टेबल मॅनर्स

Category:

 

फोर्क आणि स्पून ने जेवायचे, जेवताना अन्न खाली पडून द्यायचे नाही. प्लेट मध्ये काट्या चमच्यांचा आवाज नाही झाला पाहिजे. फोर्क किंवा क्नाइफ कोणत्या हातात पकडायची वगैरे वगैरे सांगितले गेले. अर्ध्यापेक्षा जास्त जणांना हे माहिती होते आणि त्यांना तसं जेवता पण येत होते. पण माझ्यासारख्या काहीजणांना जेवताना कसले मॅनर्स पाळायचे, जहाजावर जाऊ तेव्हा बघू असं वाटायचं. घरात मांडी घालून हाताने जेवायची सवय, शेतावर लावणी नाहीतर कापणीला डाव्या हातावर भाकरी आणि त्याच भाकरीवर वाळलेले बोंबील, सुकट नाहीतर जवळ्याचे कालवण खाताना जी चव लागते ती पंचपक्वान्ने खाताना कशी काय मिळायची आणि तीसुद्धा काटे चमच्यांनी

लेखसंग्रह

पार्ले टिळक विद्यालयाची १०० वर्षे

Category:

 

‘पार्ले टिळक विद्यालय’ संस्थेचा जन्म राष्ट्रीय अस्मितेतून, त्याग भावनेतून व उच्च महत्त्वाकांक्षेतून झाला आहे. उत्तमोत्तम मुख्याध्यापक, शिक्षक यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे. केवळ ४ विदयार्थी व १ शिक्षक यांच्या उपस्थितीत पार्ले टिळक विद्यालयाचा श्रीगणेशा झाला. चार विदयार्थ्यांसह ९९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत.

लेखसंग्रह

जगन्नाथ अष्टकम्- मराठी अर्थासह

Category:

 

एक एकट्या देवतेची (उदा. हनुमान) किंवा जोडींची (उदा. शंकर-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण,विठ्ठ-रुक्मिणी) मंदिरे आपण सर्वत्र पहातो. परंतु भाऊबहीण यांचे मंदिर क्वचितच दिसते. असे एक मंदिर आहे जगन्नाथपुरीचे कृष्ण-बलराम-सुभद्रा यांचे.

अवर्गिकृत

सोसायटी मध्ये गटबाजी झाल्यास होणारे परिणाम

Category:

 

गृहनिर्माण संस्थेच्या कामात गटबाजी असता कामा नये. सदस्यांना आपल्या संस्थेबाबत प्रेम असणे गरजेचे आहे. तरच संस्था चांगल्या प्रकारे चालविण्यास मदत होते. अन्यथा काही वर्षातच संस्था ही त्रयस्थ व्यक्ती म्हणजेच “प्राधिकृत व्यक्ती” यांची नियुक्ती करावी लागते. परंतु कालांतराने सदस्यांना झालेली चूक समजते. तोपर्यत बराच उशीर झालेला असतो आणि त्यात आपल्याला काही कळत नाही, तर योग्य व्यक्तीला विचारून त्याच्या सल्ल्याने काही कराव, हे सुद्धा बहुसंख्य लोकांना सांगायची तीव्र गरज निर्माण झाली आहे. बऱ्याचदा असे निदर्शनास येते की, उपविधीत सुधारणा करताना क्रमांकामध्ये नजरचुकीने चुका राहून जातात. त्यामुळे पुढील सर्व उपविधी क्रमांक हे बदलतात. आजच्या सत्रात अश्याच काही महत्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणारा लेख आपल्यासाठी.

अवर्गिकृत

वॉकी टॉकी

Category:

 

दुपारी दोन च्या सुमारास एबी आणि पंपी 3P टॅन्क चे झाकण उघडून तिथे काहीतरी काम करत असताना एबीच्या खिशात असलेला वॉकी टॉकी खाली टॅन्क मध्ये पडला. एबी ला वाटले आता चीफ ऑफिसर आणि कॅप्टन च्या शिव्या खायला लागतील. तो पंपीला म्हणाला कोणाला सांगू नकोस मी खाली जाऊन वॉकी टॉकी घेऊन येतो. पंपी त्याला म्हणाला वेड बीड लागलंय का तुला पन्नास फुटांवरून खाली पडलेला वॉकी टॉकी एकतर फुटला असेल नाहीतर खाली क्रूड ऑईल मध्ये खराब झाला असेल. त्याहीपेक्षा अजून टॅन्क क्लिनिंग व्हायचे बाकी आहे, खाली जाणाऱ्या शिडीवर ऑईल असेल उतरताना किंवा चढताना खाली पडशील. तू काही खाली जाऊ नको आपण सांगू कॅप्टनला. पण एबी काही ऐकेना तो खाली भराभर उतरू लागला आणि खाली टॅन्क मध्ये उतरल्यावर शोधता शोधता खाली पडला. पंपी काय ओळखायचे ते ओळखला आणि त्याने लगेच वॉकी टॉकी वरून कार्गो कंट्रोल रूम मध्ये ड्युटी ऑफिसरला एबी खाली टॅन्क मध्ये उतरला आणि बेशुद्ध पडला असल्याचे कळवले.

अवर्गिकृत

सीओसी

Category:

 

जहाजावर मरीन इंजिनियर व्हायचे म्हणजे एक वर्षाचा प्री सी ट्रेनिंग कोर्स करून कमीत कमी सहा महिने पूर्ण करावे लागतात. सहा महिने काम केल्याशिवाय मरीन इंजिनियर किंवा जवाबदार अधिकारी होण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देता येत नाही. आपल्या भारतात ही परीक्षा भारत सरकारच्या समुद्र वाणिज्य विभाग म्हणजेच मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंट कडून घेतली जाते. भारतात आणि विशेषकरून मुंबईतील केंद्रावर घेतली जाणारी परीक्षा जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा अवघड आणि कठीण समजली जाते. लेखी परीक्षा आणि त्याचसोबत तोंडी परीक्षा सुद्धा घेतली जाते. ज्यामध्ये अधिकारी होण्याकरिता लागणारी निर्णयक्षमता आणि कोणत्याही परिस्थितीला किंवा आव्हानाला सामोरे जायची सक्षमता तपासली जाते. म्हणूनच परीक्षा पास झाल्यावर मिळणारे सीओसी म्हणजे सर्टिफिकेट ऑफ कॉम्पेटेन्सी ज्याला सक्षमता प्रमाणपत्र असेच म्हटले जाते.

अवर्गिकृत

सोसायटीमधील सदनिकेचा नॉमिनी मालक / ट्रस्टी कोण ?

Category:

 

संस्थेने सदनिकेचे हस्तांतरणअन्वये व्यक्तीला सभासदत्व देण्याआधी काही अडचण आल्यास कायदेशीर सल्ला घेणे नेहमी हिताचे ठरते. असेच नामनिर्देशन (Nomination), एखाद्या व्यक्तीने अशा व्यक्तीचे नाव कागदोपत्री दाखल करणे, जी व्यक्ती असे नाव दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या नावे असलेली संपत्ती/सदनिका ताब्यात घेण्यास पात्र असेल/विश्वस्त(Trustee).

अवर्गिकृत

व्ही – सॅट

Category:

 

सूर्यदेवाचा खेळ संपल्यावर आता चंद्रदेवाने खेळ सुरु केला, चांदण्या लुकलुकायला लागल्या. ट्रेनी सिमनला म्हटलं आता चंद्रप्रकाश कसा दुधाळ दिसतोय पण तो कसल्यातरी विचारात दिसला, तरीपण तो म्हणाला दुधाळ चंद्रप्रकाश पाहिला की तिचा मधाळ चेहरा आठवतो. वाऱ्याची झुळूक आली की तिचे भुरभुरणारे केस आठवतात. जलतरंग जहाजावर येऊन आदळतात तितक्याच मंजुळ स्वरात तिच्या बांगड्या वाजल्याचे आठवतं. त्याला म्हटलं बस कर आता आठवणी, जाऊन मेसेंजर वर व्हिडिओ कॉल कर आणि बघत बस मधाळ चेहरा, फॅनवर भुरू भुरू उडणारे केस आणि बांगड्यांचे मंजुळ स्वर.

अवर्गिकृत

सोसायटी मध्ये खर्चाची जबाबदारी कोणाची

Category:

 

मागील लेखात आपण तक्रार कोणाकडे करायची ते वाचले परंतु बरेच पदाधिकारी चुकीच्या समजुतीने आपले सदस्याने स्वत: करायचे खर्च संस्थेच्या खर्चाने अथवा संस्थेचा खर्च बऱ्याचवेळा सदस्यांना करावयास लावतात. सदर लेखात याबाबत बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्यासाठी.

अवर्गिकृत

एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट

Category:

 

बाळ गर्भात एका बाजूला गेल्याने बाळाने मुव्हमेन्ट करून दुसऱ्या बाजूचे अवयव दिसावे म्हणून डॉक्टर प्रशांत पाटील यांनी प्रयत्न केले. पण बाळ फिरायला तयार होईना म्हणून ते मिस्कील पणे म्हणाले की बाळ झोपा काढतय हलायला तयार नाहीये आणि त्याचक्षणी बाळाने एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर फिरावे तशी गर्भात गिरकी मारली. बाळाची पूर्ण तपासणी संपत आली असताना बाळाचा एका हाताचा पंजा सोनोग्राफी स्क्रीन वर हलताना दिसला. डॉक्टर प्रशांत पाटील यांनी लगेच बघा बाळ गर्भातुन आपले बोलणे ऐकून आता आपल्याला टाटा बाय बाय सुद्धा करत आहे असे हसून सांगितले.