अवर्गिकृत

एका दिशेचा शोध

Category:

 

उदार अर्थव्यवस्था भौतिक प्रगती करतांना त्यातील सर्वसमावेशकता आपण विसरून गेलो आहोत. गजबजणारे मॉल्स, पैशाची उधळ्पट्टी करुन, झगमगाटात साजरे होणारे उत्सव, मौजमजेसाठी परदेशी वाऱ्या हे सर्व फ़क्त ५-७ टक्के लोकांसाठीच आहे. या लोकांची प्रगती म्हणजे आपण आर्थिक महासत्तेच्या वाटेवरील वाटसरू झालो, असे आपण मानतो.

  October 28, 2010


अवर्गिकृत

वाळू उपशाच्या नव्या धोरणातून काय साधेल ?

Category:

 

अवैध वाळू उपशासंदर्भात सतत तक्रारी उपस्थित होऊ लागल्यानंतर अखेर न्यायालयाने वाळू उपशावरील बंदीचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आपले नवे धोरण नुकतेच जाहीर केले. त्यात वाळु उपशासंदर्भात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. असे असले तरी या निर्णयात त्रुटी आढळतात. त्याचा फायदा घेऊन वाळू उपशाबाबत पुन्हा पहिल्यासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  October 27, 2010


अवर्गिकृत

एम एस एक्सेलमध्ये (MS Excel) मध्ये भारतीय कॉमा

Category:

 

म्हणजे आपण लिहितो १२०२३४३२ आणि याला जर कॉमा लावला तर हि सख्या दिसतांना अशी दिसेल १२,०२३,४३२.०० आणि आपल्याला हवी असते भारतीय पद्धत म्हणजे १,२०,२३,४३२.००

  October 26, 2010


अवर्गिकृत

नियंत्रणमुक्तीचेही राजकारण

Category:

 

राज्यातील साखर कारखानदारी सतत चर्चेत असते. विशेषत: आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना सरकारकडून दिल्या जाणार्‍या कोट्यवधींच्या मदतीबाबत उलटसुलट मते व्यक्त होतात. या पार्श्वभूमीवर साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. पण, इतर बाबतीत खासगीकरणाचे धोरण स्वीकारणारे सरकार सत्तास्वार्थासाठी या उद्योगाला नियंत्रणमुक्त करू इच्छित नाही.

  October 26, 2010


अवर्गिकृत

कलमाडींचा होणार ललित मोदी ?

Category:

 

राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचाराची नव्याने चर्चा सुरू झाली. त्यातच एका पक्षाचे असूनही शीला दीक्षित आणि सुरेश कलमाडी या भ्रष्टाचाराबाबत एकमेकांवर आरोप करत आहेत. अनेकांना हे प्रकरण आयपीएलसारखे बाष्पीभूत होईल का, अशी शंका भेडसावत आहे. आयपीएल प्रकरणात ललित मोदींचे कोंबडे कापून सत्तेच्या देवीला शांत करण्यात आले. राष्ट्रकुल प्रकरणात फार तर कलमाडींचा ललित मोदी होईल असे दिसते.

  October 26, 2010


अवर्गिकृत

लग्नाचा बस्त्याची खरेदी करण्यापूर्वी……………………..

Category:

 

चला कुठे पैसे आपल्याला द्यायचे म्हणून दोनही घराची मंडळी दाबून खरेदी करतात आणि रुपये १०००० मालाचे २०००० देऊन येतात

  October 26, 2010


अवर्गिकृत

प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

Category:

 

राज्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या चर्चेने वेग घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही निवड निश्चित होईल असे दिसते. मुख्य म्हणजे आपल्याला हवी ती व्यक्ती प्रदेशाध्यक्षपदी विराजमान व्हावी यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि केंद्रातील मंत्री विलासराव देशमुख हे दोघेही कसून प्रयत्न करत आहेत. ही त्यांच्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची नामी संधी आहे. यात कोण बाजी मारतो हे पहायला हवे.

  October 23, 2010


अवर्गिकृत

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नियोजनबध्द शेती

Category:

 

शिक्षणास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन आणि उत्पन्नात भरीव वाढ करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील रहिवासी दत्तात्रय भानुदास चव्हाण यांनी घालून दिले आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री. चव्हाण यांनी फळबाग आणि भाजीपाला पदविका मिळविली. पदविका घेत असतानाच ते खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राचे सदस्य झाले आणि कृषिविषयक माहिती घेऊ लागले.

  October 22, 2010


अवर्गिकृत

साठवणुकीकडे कानाडोळाच

Category:

 

योग्य साठवणुकी अभावी लाखो टन अन्नधान्य वाया जाण्याच्या घटना देशात अनेकदा घडतात. त्यासंदर्भात सरकारवर तसेच कृषी खात्यावर वेळोवेळी ताशेरेही झाडण्यात आले आहेत. तरीही धान्य साठवणुकीचा महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित आहे. खरीप हंगामात झालेले अधिक उत्पादन आणि रब्बीतील उत्पादनवाढीची शक्यता लक्षात घेता अजून तरी शासनाने साठवणुकीबाबत काही ठोस निर्णय घेतल्याचे दिसत नाही.

  October 22, 2010