लेखसंग्रह

मेंदूवर क्ष-किरण

Category:

 

मानवी मेंदूसारख्या गुंतागुंतीच्या किचकट अवयवाबद्दल आपणास खरंच कितपत माहिती आहे? उत्तर असं आहे – फारशी नाही. मेंदू या अवयवावर आजतागायत सर्वाधिक संशोधन झालेलं आहे आणि अजूनही सुरु आहे. मात्र हातात काही भरीव लागत नाही. शरीराचे अनभिषिक्त सत्ताकेंद्र मेंदू आहे. प्रसंग, परिस्थिती, घटना यांच्याबाबत अहोरात्र माहिती घेऊन त्यांवर तातडीने निर्णय घेणे हे मेंदूचे प्राथमिक कार्य असते. सर्व अवयवांमध्ये सुसूत्रता राखणे आणि शरीराचे कामकाज सुरळीत सुरु ठेवणे यामध्ये मेंदू गुंतलेला असतो.

  July 4, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

शाश्वताच्या दालनात पाऊल !

Category:

 

मी या जगातून एक दिवस ठरवून लुप्त होईन
जंगलात एकाकी भटकण्यासाठी
तुझे जीवनगाणे गाण्यासाठी
त्या गाण्यात माझे तुझ्यावरचे छुपे प्रेम असेल,

  July 4, 2021


साहित्य - ललित

प्रार्थनांचे सहस्वर !

Category:

 

शालेय कालखंडानंतर प्रार्थना आपल्या आयुष्यातून हद्दपार होते. क्वचित घरात संध्याकाळी ” शुभं करोति ” असे बोबडे बोल उमटतात, एखाद्या धार्मिक कार्यक्रमात आपण प्रार्थना करतो, अध्यात्मिक सत्संगात प्रार्थना भैरवीसारखी असते- ” लोकः समस्ता सुखिनो भवन्तु ” वगैरे! कार्यक्रम संपल्याची ती नांदी असते, पटकन डोळे उघडून दैनंदिनीत शिरायला मोकळे!

  July 2, 2021


साहित्य - ललित

मेल – फिमेल व्हर्जन्स !

Category:

 

बासुदांच्या निधनानंतर श्रद्धांजलीच्या पोस्ट्समध्ये लताच्या आवाजातील “रिमझिम गिरे सावन ” नव्याने ऐकलं. मी पाहिलेल्या “मंझिल ” च्या प्रतीत ते समाविष्ट नव्हतं, पण बहुधा या खूप वर्ष रखडलेल्या चित्रपटातील एडिटिंग मध्ये ते उडवलं असण्याची शक्यता आहे.

  July 1, 2021


लेखसंग्रह

स्वतःला घडविताना !

Category:

 

प्रत्येकाला स्वतःमधील कोणीतरी असा “स्वतः “घडविता आला पाहिजे, ज्याचा इतरांना अभिमान वाटेल, स्वतःची मान गर्वाने उन्नत करता येईल आणि जे डोळ्यापुढे असेल, ते हाताच्या आवाक्यात आणता येईल. त्या वाटेवरील काही पायऱ्या….

  June 30, 2021


साहित्य - ललित

जाहल्या काही चुका…..

Category:

 

एक अत्यंत नितांत सुंदर भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण पाडगावकरांनी ते लीलया पार पाडले. खळेंसारख्या श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले. आणि लताने ती आर्तता, लीनता, अत्यंत संयमित, संतुलित आणि शांत स्निग्ध स्वरात परीपक्वपणे मांडली. या गाण्यातील शब्दाशब्दांचे विवेचन आमच्या मैत्रिणीने तितक्याच तोलामोलाने सिद्ध केले -अभिनिवेश न आणता !

  June 29, 2021


लेखसंग्रह

ताण – तणावांचे विषाणू

Category:

 

ताण -तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण -तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण -तणावांना काही देणे -घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे.

  June 27, 2021


लेखसंग्रह

सवयींचे व्याकरण !

Category:

 

स्वभावातून सवयीचा उगम पावतो. लहानपणापासून सगळ्यांनाच बऱ्या-वाईट सवयी लागतात. अगदी बालसुलभ म्हणजे अंगठा चोखणे, नखे कुरतडणे, दिसेल ते तोंडात घालण्याची प्रवृत्ती असणे. ! त्यानंतर खोटे बोलणे, भरभर (अथवा हळूहळू) जेवणे, कोठेही (दिलेल्या) वेळेवर पोहोचणे, गोष्टी/ कामे पुढे ढकलणे, सकाळी उशिरा उठणे आणि ही यादी संपता संपणार नाही.

  June 26, 2021


लेखसंग्रह

हम’ कितने (?) ‘एकाकी’

Category:

 

साहाजिकच जगभर एकाकी अवस्था आणि त्याचे स्वास्थ्यावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम यांवर संशोधन सुरु झाले आहे. जास्त कालावधीसाठी एकाकी असलेल्या व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर जास्त परिणाम झालेले आढळतात, अगदी सिगारेटच्या व्यसनाइतके अथवा लठ्ठपणाच्या दुष्परिणामां इतके !

  June 25, 2021


लेखसंग्रह

भावनिक आरोग्य

Category:

 

संगणक दोन भागांपासून बनविलेला असतो- हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ! मानवी शरीरातील बाहेरची कातडी, हाडे,स्नायू हे दृश्य भाग म्हणजे हार्डवेअर ! आणि मन, भावना, आत्मा हे अदृश्य भाग म्हणजे सॉफ्टवेअर ! मात्र हे दोन्ही घटक आतून एकच असतात. तसेच बाह्य विश्व आणि शरीरातील अदृश्य शक्ती एकमेकांना जोडलेले असतात. भावनिक आरोग्य सॉफ्टवेअरशी संबंधित आहे. आपल्या प्रत्येक कृतीमागे ते असते.

  June 24, 2021