विश्वास
Category:
कथा साहित्य - ललितसुनीताच्या चेहऱ्यावर मनातली खुशी तरळून गेली. विश्वास आत आला. पाठीवरची सॅक हातात घेतली. कुठे बसावे हे न कळल्यामुळे तो तसाच उभा राहिला. सुनीता त्याचे निरीक्षण करीत होती. सहा फूट उंची, कुरळे केस, पिंपल्सनी भरलेला उभट चेहरा, गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळी पँट व इन केलेला पांढरा शर्ट. डोळे थोडे मोठे असते तर आपल्या अजयसारखा बराचसा दिसला असता. तिला परदेशात असलेल्या तिच्या मुलाची तीव्रतेने आठवण आली. ती म्हणाली, ‘अरे, बस ना खूर्चीवर, सामान आणलं नाहीस का तुझं? इथं राहायला आलास ना तू?’