लेखसंग्रह

मराठा’ आरक्षणाच्या उंबरठ्यावर

Category:

 

वीस-पंचवीस वर्षांचा संघर्ष, ५८ मूक मोर्चे, ठोक आंदोलने आणि अनेक मराठा बांधव समाजासाठी शाहिद झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. आरक्षण लागू करण्यासाठी मराठा समाजाच्या एकंदर परिस्थितीचे अध्ययन करणाऱ्या मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून यात मराठा समाजाचं आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण मान्य करण्यात आलं आहे.

लेखसंग्रह

नोटाबंदी – बर्बादीची दोन वर्ष

Category:

 

भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटांवर प्रहार करून दहशतवादी कारवायांना मिळणारी रसद संपविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबर रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशाने काय साध्य केले, याचं स्पष्टीकरण अद्याप पंतप्रधान किंव्हा सरकारने दिलेलं नाही. देशाच्या एकंदर जडणघडणीसाठी नोटबंदीच्या निर्णयाला ऐतिहासिक ठरविण्यात आले होते.

लेखसंग्रह

नीट (NEET) परिक्षेच्या उत्तराची भाषा

Category:

 

महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने नीटची परीक्षा देत असताना परीक्षा अर्ज भरतानाच मराठी ही उत्तराची भाषा निवडण्याची काळजी घ्यावी असे केल्यास मिळणारे मोठे यश पुढील वर्षी निकाला नंतर मला कळवावे हे आवाहन !

लेखसंग्रह

सीकेपी तितुका मेळवावा

Category:

 

महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातील जाती शोधून त्यांना एकमेकांविरुद्ध  झुंजविण्याचे राजकारण सुरु आहे. अशा वेळी दुसऱ्या जातीबद्दल काही चांगले लिहिण्याचे मी धाडस करतो आहे. ही जात म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ! म्हणजेच सीकेपी समाज !!

लेखसंग्रह

पुन्हा एकदा ‘जय श्रीराम’

Category:

 

राजकीय पक्षांकडून ‘राम’ नामाचा जप सुरु झाला कि निवडणूक आली, हे आता लोकांना माहीत झालेले आहे. श्रीरामाचे नाव घेऊन देशातील बहुसंख्य हिंदूं मतांचे भावनात्मक ध्रुवीकरण करता येते, याची जाण राजकारण्यांना असल्याने प्रत्येक निवडणुकीत ‘राममंदीर’ हा काही राजकीय पक्षांच्या ठेवणीतील मुद्दा राहिला. निवडणुका आल्या कि ‘बनायेंगे मंदिर’ चा नारा द्यायचा. आणि निवडणुका झाल्या कि तांत्रिक मुद्द्यांचा कीस पाडून त्याला बगल द्यायची. हे राजकारण अनेक वर्षांपासून देशात केल्या जातेय.

कानडी दंडेली
लेखसंग्रह

कानडी दंडेली

Category:

 

गेल्या सहा दशकापासून कानडी झेटिंगशाहीचा सामना करणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या अस्मिता दुखावण्याचा खेळ अजूनही सुरूच असून कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषिक तरुणांची डोकी फोडून आता तर कहरच केला आहे. १ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापनेचा दिन सीमा भागातली मराठी जनता काळा दिन म्हणून पाळते. महाराष्ट्रद्वेषाने पछाडलेल्या कानडी सरकारने कार्यकर्त्यावर लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले आणि कर्नाटक पोलिसांनी शेकडो मराठी भाषकांची डोकी फोडली. याला महाराष्ट्रद्वेषाचा कळस म्हटला पाहिजे.

लेखसंग्रह

रेल्वेची अद्भुत, रंजक दुनिया

Category:

 

रेल्वेच्या संबंधातील विषयांची व्याप्ती फारच मोठी आहे. इतिहास,  रेल्वे बांधणी, विविध मार्ग, गाड्या, प्लॅटफॉर्मस,  वेटिंग रुम्स,  स्टेशनांच्या इमारती, तांत्रिक माहिती….  खरंतर या जंत्रीला शेवटच नाही,  या सर्वांमधून मिळणारी माहिती शोभादर्शकातून म्हणजेच  `कॅलिडोस्कोप’ मधून दिसणाऱ्या रंगीत काचेच्या तुकड्यांच्या क्षणचित्रांसारखी रंजक आहे.

लेखसंग्रह

एक विसरलेला इतिहास

Category:

 

2011 मध्ये काँग्रेस सरकार असताना त्यांनी लक्ष्मीचंद जैन यांना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्म विभूषण दिले, हे तेच लक्ष्मीचंद जैन होते ज्यांनी स्वतःच्या देशाविरोधात आणि सरकारविरोधात राजदूत असताना देशाने अणूचाचणी घेतली म्हणून भूमिका घेतली होती.

लेखसंग्रह

इंजिन ड्रायव्हर आणि गाडीचा प्रवास

Category:

 

विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसर येथे झालेल्या मोठ्या रेल्वेअपघातांमध्ये रेल्वेचे जबाबदारी होती का?   इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का?  रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का?  असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले.  याच संदर्भात रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर कसा परिस्थितीत काम करतात,  त्यांच्या कामाचे स्वरुप काय असतं,  याचं फार सुंदर विवेचन या लेखात केलेलं आहे. दोन ते तीन हजार प्रवाशांच्या सुखकर प्रवासाच्या नाड्या इंजिनातील दोन कर्तबगार माणसांच्या हातात असतात याची जाणीव प्रवासात एकदा जरी आली तर तो त्यांच्या सचोटीच्या कामाला मानाचा मुजरा ठरेल.