असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर !
लेखसंग्रह

असंवेदनशीलतेचा ‘महा’ पूर !

Category:

 

महापुरात अडकलेल्या सांगली, कोल्हापुरातील भीषण परिस्थिती पाहून अवघ्या महाराष्ट्राची झोप उडाली आहे..स्वतःचा जीव जात असतानाही कडेवरच्या लेकराला घट्ट पकडून राहिलेल्या मृत महिलेचे आणि बाळाचे छायाचित्र काळीज पिळवटून काढत आहे..पलुस दुर्घटनेतील एका-एका मृतदेहाचे चित्र आठवले तरी मनाला चटका लागुन डोळ्यात चटकन पाणी येते.. आणि, अशावेळी पूर परिस्थतीची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री हसत हसत सेल्फीसाठी ‘पोज’ देतात, या असंवेदनशीलतेला काय म्हणावे ?

लेखसंग्रह

स्वातंत्र्यवीर सावरकरांची भाषाशुध्दी चळवळ

Category:

 

1924 साली स्वातंत्र्यवीरांनी,भाषाशुध्दीचं आंदोलन सुरू केलं.तेव्हाच त्यांनी भाषाशुध्दि ही पुस्तिका लिहीली. या पुस्तिकेत अ ची बाराखडी तर वापरली आहेच, शिवाय अर्धा (लंगडा)र,अैवजी र् हे चिन्ह वापरलं आहे.
गीर्वाण,तुर्क,सर्वांची हे शब्द ..अर् धा, गीर् वाण, तुर् क, सर् वांची…असे लिहीले आहेत. (माझ्या संगणकावर हा र् नीट लिहीता आला नाही. प्रिंटवर हातानं दुरूस्ती करावी लागेल.). ‍‍

लेखसंग्रह

राब

Category:

 

केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते.

लेखसंग्रह

चैतन्यमय पर्व

Category:

 

आषाढ लागतो ना लागतो तोच आखिल वारकरी संप्रदायात उल्हास दाटून येतो. ही सात्विक कुणकुण जणू एक वैश्विक चैतन्याचं पर्वच ठरते नी ह्या चैतन्याची खरी मुहूर्तमेढ रोवली जाते ती जेष्ठ वैद्य सप्तमी पासून सुरु होणाऱ्या वारीच्या रुपाने.वारीला किमान साडेसातशे वर्षाची परंपरा लाभलीये असे म्हणतात .ह्या वारीचं प्रस्थान होतं ते आळंदीहून. जेव्हा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची पालखी अश्वारुढ होते.

लेखसंग्रह

यशाचा निर्मळ झरा…….

Category:

 

जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी नवीन करण्याची धडपड असते. आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच करतात. पण प्रत्येक व्यक्तीला अपेक्षित यश मिळणार असे नसते तर कधीकधी अपयशाला ही सामोरे जावे लागते, पण त्या अपयशाला खचून न जाता जिद्द चिकाटीने आपल्या यशाची नौका पैलतीरी नेली पाहीजे.

लेखसंग्रह

विठ्ठल नामाचा गजर

Category:

 

कला अकादमीची अखिल गोवा भजनी स्पर्धा ही भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केली जाते. 1979 साली मनोहरबुवा शिरगावकर कैलासवासी झाले. मनोहरबुवांच्या स्मरणार्थ कला अकादमीचे तत्कालीन अध्यक्ष व गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या सूचनेवरून कला अकादमीने भजन स्पर्धा गोव्यात सुरू केली.

ऐतिहासिक निकाल!
लेखसंग्रह

ऐतिहासिक निकाल!

Category:

 

वर्षानुवर्ष आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे चटके सहन करत संविधानिक मार्गाने आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या सकल मराठा समाजाच्या संघर्षाला यश आले असून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपली मोहोर उमटवली आहे.

लेखसंग्रह

शेतकऱ्यांना मुक्त करा

Category:

 

शेती व्यवसाय ‘प्रगत’ आणि ‘समृद्ध’ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आजवर अनेकदा अधोरेखित करण्यात आली. शेतीच्या विकसितकरणासाठी नवनवीन संशोधनाच्या घोषणाही बऱ्याचदा करण्यात आल्या. मात्र अंलबजावणीच्या पातळीवरील सगळ्या चर्चा आणि घोषणा वांझोट्या ठरत असल्याचे चित्र समोर येत असून त्यामुळे शेतकरी आणि सरकार यांच्यात नवनव्या मुद्यावरून संघर्ष उफाळून येत आहे.