लेखसंग्रह

“अवघे धरू सुलपुंज पंथ” अर्थात सूक्ष्म व लघु उद्योग पुंज विकास कार्यक्रम

Category:

 

“एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ” च्या ऐवजी “अवघे धरू सुलपुंज पंथ ” म्हटल्यास साखर उत्पादन क्षेत्रात सहकारान जी जादू केली तीच जादू, पुंज योजनेतून चर्म, सौंदर्य प्रसाधन, ऑटो पूरक उद्योग, काजू प्रक्रिया, वाईन उद्योग, वस्त्रमाग,पैठणी,चादर/ सतरंजी उत्पादन इ . सर्व सुल उद्योजकांना अनुभवता येईल. क्षेत्र कुठलेही असो, गरज आहे सुल उद्योग म्हणून नोंदणी करण्याची व एकदिलान,एकत्र येऊन बीज भांडवल काढून पुंज स्थापन करण्याची.

लेखसंग्रह

अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात

Category:

 

अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल .

लेखसंग्रह

आयुर्विमा समजुन घ्या

Category:

 

आयुर्विम्याचा उद्देश हा घरातील कर्ता माणूस गेल्यावर त्याच्या कुटुंबाला साधारणपणे तीच जीवनशैली जगता यावी यासाठी तरतूद करणे हा आहे असे ढोबळमानाने म्हणता येईल. थोडक्यात विम्याची आलेली रक्कम गुंतवून त्याच्या उत्पन्नातून त्या कुटुंबाला जगता आले पाहिजे असा यामागचा विचार आहे. पण हळूहळू विमा कंपन्यांनी विविध प्रकारच्या योजना काढून या विचाराची व्याप्ती वाढवली. विम्याला करसवलत लागू केल्याने याकडे एक गुंतवणुकीचे साधन म्हणूनही पाहण्यास सुरुवात झाली. आपण या लेखात ढोबळमानाने या योजनांचा विचार करणार आहोत.

लेखसंग्रह

आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.

Category:

 

जगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या.

लेखसंग्रह

“लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी!” – भारतात निर्माण झालेलं सर्वात भव्य गीत.

Category:

 

सुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.

लेखसंग्रह

मराठी भाषा दिन

Category:

 

मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा केला जातो.