C-28-M-CTBD
स्वताचं भरलं ना!
Category:
अवर्गिकृतराजकारण्यांनो जागे व्हा! ही जी काय तुमची भोंदुगिरि चालली आहे ती थांबवा नाहीतर नेता या नावालाच एक दिवस लोकं शेण फासतील. याच्यामागचं जे राजकारण असेल ते असो पण गरिबांना लुटु नका. पंचपक्वानांनी जर रोज जेवत असाल तर, त्या तुमच्या थाळीत पाच भुकेले पोट भरतील हे लक्षात ठेवा.
फक्त तु आणि फक्त तु
Category:
अवर्गिकृतप्रत्येक प्रेमात पडलेल्या वक्तीला असंच वाटतं
प्रेमाचा भुकेला
Category:
अवर्गिकृतप्रेम करणं फाज सोपं असतं पण टिकवणं फार कठीण
कांदा साठवा, भाव मिळवा
Category:
अवर्गिकृतअलीकडे चातुर्मासातही कांदे खाणार्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात कांद्याला अधिक मागणी प्राप्त होते तसेच त्याला दरही चांगला मिळतो. पण या हंगामात किंवा अन्य वेळी बाजारात अनुकूल परिस्थिती असताना कांदा बाजारात आणायचा तर त्याची योग्य साठवणूक व्हायला हवी. या बाबीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे खराब झालेला कांदा अक्षरश: रस्त्यावर फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर येते.
काँग्रेसी सफाई मोहिम काय साधणार ?
Category:
अवर्गिकृतअखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा सोनिया गांधींनी मंजूर केला. विधिमंडळात प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावे लागू नये यासाठी हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पक्षाने हा निर्णय घेतला. सुरेश कलमाडींनाही पक्षाच्या सचिवपदावरून हटवण्यात आले. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत सफाई मोहिम राबवण्यात आली असली तरी ती कितपत परिणामकारक ठरणार हा खरा प्रश्न आहे.
धाडसत्राने काय साधले ?
Category:
अवर्गिकृतशासनाच्या जवळपास सर्व खात्यातील भ्रष्टाचाराचे नमुने अधुनमधून चर्चेत येतात. त्यातही प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारभाराबाबत प्रचंड तक्रारी असतात. काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धाडसी कारवाई करत परिवहन खात्याच्या विविध कार्यालयांवर धाडी घातल्या. या धाडसत्राने नेमके काय साधले हे समजणे कठीण असले तरी त्यानिमित्ताने प्रादेशिक परिवहन खाते पुन्हा चर्चेत आले हे मात्र नक्की.
हरभजनचा ‘मास्टर स्ट्रोक’
Category:
अवर्गिकृतन्यूझिलंडविरुद्धच्या अहमदाबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर असताना मोक्याच्या क्षणी हरभजनसिंगने चमकदार शतक झळकावून हा पराभव टाळला. आजवर आपल्या गोलंदाजीने देशाला विजय मिळवून देणार्या या सिंगने पहिले-वहिले कसोटी शतक झळकावून फलंदाजीतही आपण कमी नसल्याचे सिद्ध केले.