C-28-M-CTBD
शतावरी…..एक दिव्य आयुर्वेदिक वनस्पती !
Category:
अवर्गिकृतविविध गुणधर्म असणाऱ्या शतावरीची शेती केल्यास अधिक फायद्याची ठरू शकते, शतावरीच्या वाळलेल्या मुळ्या ३०० ते ४०० रुपये प्रती किलो दराने विकल्या जातात. वार्षिक सरासरी पर्जन्य २५० ते ३०० से.मी.पडतो, तसेच १० ते ५० डिग्री सेल्सियस तापमान आहे त्या ठिकाणीही सहजपणे उत्पादन घेता येते. शेतकऱ्यांना वरदान ठरू शकणाऱ्या ह्या औषधी वनस्पतीच्या शेतीला सुरुवात होणे आवश्यक आहे.
गुणधर्म /उपयोग :- शीत, तिक्त, बुद्धिवर्धक, अग्निवर्धक, शुक्र दुर्बलता दूर करणारी, अशक्तपणा दूर करणारी, अनेक स्त्रीविकारांमध्ये उपयोगी, ऐनिमिया, संधिवात, अर्धांगवायू, लचक, मुरड तसेच हृदयाला बल देणारी व संकाचन क्षमता वाढविणारी, तसेच स्त्रीयांमध्ये गर्भाशय उत्तेजना थांबवून गर्भाशयाची गती संतुलित करणारी. निद्रानाश, रातआंधळेपणा, स्वरभंग, डोकेदुखी तसेच विषघ्न आहे.
दिव्य औषधी- पांढरी मुसळी
Category:
अवर्गिकृतजगातील एकूण उत्पादनाच्या सहा ते सात पट जास्त मागणी असलेली आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणजे पांढरी मुसळी होय. पांढऱ्या मुसळीचे शास्त्रीय नाव – Chlorophytum borivillanum , कुळ- Liliaceae , मराठी नाव- पांढरी मुसळी,सफेदा हिंदी नाव- सफेद मुसली, धोली मुसली संस्कृत नाव- मुसला असे आहेत.
पांढऱ्या मुसळी मध्ये कार्बोहायड्रेडस , प्रोटीन, स्यापोजेनीन, स्यापोनीन, तसेच अनेक खनिज आढळतात.शारीरिक दुर्बलता तसेच ताकतीसाठी, पौष्टिक व बलवर्धक, स्तनदा मातांचे दुध वाढविण्यासाठी, प्रसवोत्तर होणारे स्त्रीरोगांवर उपयोगी, मधुमेह, वंधत्व कमी करण्यासाठी, शुक्रजंतू वाढीसाठी अशा अनेक आजारांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात होतो.
प्रेमःएक आठवणींची किवता.
Category:
अवर्गिकृतप्रेमःएक आठवणींची कविता. पुढे चालू…
प्रेमःएक आठवणींची कविता.
Category:
अवर्गिकृतप्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू……..
वेधशाळा
Category:
अवर्गिकृतकाही जागा अशा असतात की ज्यांच्याविषयी मनोमन कुतुहल असूनसुध्दा त्या जागांच ऐतिहासिक महत्व किंवा मोल काय आहे, भूतकाळात व वर्तमानात त्यांच्या समाजाप्रती असलेल्या योगदानाची व्याप्ती काय आहे याची जाणीव आपल्याला नसते. त्या जागेमध्ये नक्की काय चालतं व कुठल्या वैशिषट्यांमुळे त्या जागेची किर्ती ही सर्वदुर पसरलेली आहे, यांविषयी आपल्या मनात पुर्णपणे काळोख नसला तरी पुर्ण प्रकाशसुध्दा नसतो. समस्त अलिबागकरांच्या व पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली व अलिबागसारख्या बिंदुभर गावाला केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या नकाशामध्ये प्रतिष्ठेचं व सन्मानाचं वलय प्राप्त करून देणारी अशीच एक ऐतिहासिक व प्राचीन जागा म्हणजे अलिबागची चुंबकीय वेधशाळा.
काही नात्यांना कधी…
Category:
अवर्गिकृतस्वामी निश्चलानंदांची एक रचना
वृत्तवाहिन्यांचे भान सुटले
Category:
अवर्गिकृतअलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच ‘गुप्तचर’ असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच ‘कळले’ अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.
बॉम्बस्फोट आणि राजकारण
Category:
अवर्गिकृत१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.
बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.
महाकवी कालीदास – भाग ४
Category:
अवर्गिकृतमहाकवी कालीदासाची कथा काव्य रूपात मांडली आहे