अवर्गिकृत

विज्ञान आणि अध्यात्म ः विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता-गीतेत सामावलेले विज्ञान.

Category:

 

पौराणिक ग्रंथात भरपूर विज्ञान सामावलेले आहे. पण ते अध्यात्मात बुडालेले आहे. गीतेच्या मुखपृष्टावर असलेल्या चित्रासंबंधाने या लेखात विचार मांडले आहेत.

धार्मिक ग्रंथातील विज्ञान, शोधा म्हणजे सापडेल, पहा म्हणजे दिसेल आणि विचार करा म्हणजे कळेल.

अवर्गिकृत

हिंदुमहासभा आणि सावरकर

Category:

 

१९०६ साली व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो ह्याच्या आशिर्वादाने मुस्लिम लीगची स्थापना झाली. मुस्लिम लीग ही पुर्वीपासून ब्रिटीशांशी एकनिष्ठ होती. लीगच्या स्थापनेमागे महत्वाचे कारण हिंदु-मुस्लिम ह्यांत दरी वाढवीणे. म्ह्णुन इंग्रजांची मुस्लिमांचे लाड पुरवणे व त्यांना अधिक प्रतिनीधीत्व देऊन त्यांचे राजकिय महत्व वाढवीणे व मुस्लिम बहुसंख्य प्रांत निर्माण करणे, अशी धोरणे हाती घेतली. त्या काळात आबालवृद्धांना मतदान करण्याची अनुमती नव्हती.प्राप्तीकर भरणारा, पदवीधर किंवा घर-जमीन असणाराच मतदान करु शकत असे.

अवर्गिकृत

विज्ञान आणि अध्यात्म – पूर्ण ब्रम्ह.

Category:

 

ऋषिमुनींची प्रतिभा अचाट होती. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व देखील असामान्य होते. त्यांचे ज्ञान त्यांनी लाखो श्लोकात लिहून ठेवले आहे. या श्लोकांच्या काही ओळी वाचीत असतांना जीभ अक्षरश: अडखळते. पण श्लोकात गुंफलेले हे ज्ञान, शिष्यांच्या अनेक पिढ्यांनी, तोंडपाठ करून शेकडो वर्षे जतन केले. लिहीण्याचे तंत्र विकास पावल्यानंतर हे सर्व ज्ञान लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. लिखित मजकूरही शेकडो वर्षे दुर्मिळच होता. सर्व साहित्य हस्तलिखित स्वरूपातच होते त्यामुळे त्याचा प्रसार सामान्य माणसांपर्यंत पोचला नाही. त्या काळी ध्वनीलेखनाचा शोध लागला नव्हता. म्हणून त्यांना अभिप्रेत असलेले उच्चार आपल्याला करता येत नाहीत.

पाठांतर आणि हस्तलेखन यात व्यक्तीनिहाय थोडेथोडे बदल होत गेले.

हे पौराणिक साहित्य मूळ स्वरूपात आता फारच दुर्मिळ झाले आहे. ज्या थोड्या विद्वानांनी मूळ पोथ्या मिळवून, श्लोकांचा अन्वयार्थ लावून, प्रचलित भाषात भाष्ये करून ठेवली असल्यामुळे, आपल्याला आता त्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळेच हजारो वर्षापूर्वीचे ऋषिमुनींचे विचार, आपल्यापरीने आपल्याला कळतात.

पाचसहा हजार वर्षांपूर्वी, मौखिक माध्यमात साठविलेल्या कित्येक श्लोकांचा, ऋषिमुनिंना अभिप्रेत असलेला अर्थ, आज आपल्यापर्यंत पोचला आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही.

.

अवर्गिकृत

आरक्षण…सोयीस्कर राजकारणाचं स्त्रोत!

Category:

 

“मुस्लिम मागासवर्गाला आरक्षण”…निवडणुकांच्या तोंडावर घोषित आरक्षणाला सोयीस्कर राजकारणाचं स्त्रोत म्हटलं तर वावगे ठरेल का?…‘नॉन-क्रिमीलेअर’ सारख्या जाचक अटीमुळे ओबीसी, विमुक्त जाती, एस.बी.सी. व भटक्या जमातींना इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या कितीतरी सेवापदांना मुकावे लागले. ‘नॉन-क्रिमीलेअर’ या अटीची व्याख्या “उच्चवर्णीयांतील प्रत्येकजण श्रीमंत नसतो तसचं मागासवर्गातील प्रत्येकजण गरीब नसतो” या सिद्धांताला अनुसरून त्यांना समान पातळीवर आणायचे असेल तर मग उच्चवर्णीयांसहित सरसकट सगळ्यांनाच आर्थिक निकषावर आरक्षण का नाही?. आरक्षणासाठी फक्त जातींचाच व अल्पसंख्याकांचाच आधार का ?.केंद्र व राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरक्षणातून नेमका कोणत्या गोष्टीचा मागासलेपणा एका समान पातळीवर शासन आणू पाहतेय.

अवर्गिकृत

माझी तत्वसरणी :: धर्माचरणांचा कार्यकारणभाव.

Category:

 

माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण, ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी….तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेऊन मी हे लेख लिहिले आहेत.

दैनंदिन जीवनात आपण, दिवसाचा काही भाग, विशेषतः आंघोळीनंतर, देवपूजा, पोथ्या वाचन, जपजाप्य, मंत्रपठण, ध्यानधारणा, एखादे स्तोत्र म्हणणे वगैरेत घालवितो. ही सर्व धार्मिक आन्हिके, पुरातन काळापासून आचरली जात आहेत. ही आन्हिके केव्हातरी, कुणीतरी, काही विशिष्ट उद्देश ठरवून प्रचारात आणली असावीत. दिवसाचाकाही काळ, इतर विचार बाजूस सारून, चांगले सात्विक विचार मेंदूत यावेत हाच असावा असे वाटते. विज्ञानीय दृष्टीकोनातून या सर्वांचे मनन केल्यास, बर्‍याच बाबींचा उलगडा होतो.

अवर्गिकृत

नोकरशाही कि भेकडशाही?

Category:

 

“शिवरायाचे आठवावे स्वरुप, शिवरायाचा आठवावा साक्षेप. शिवरायाचा आठवावा प्रताप, भूमंडळी”. हा उपदेश समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी महाराजांना केला. तरी आपण सर्वांनी हा उपदेश लक्षात घ्यायला पाहिजे. कुठल्याही क्रांतिकारकाचे/सज्जनाचे आराध्य शिवाजी महाराज होते(आहेत?). शिवाजी म्हणजे जगण्याची पद्धत. शिवाजी महाराजांसारखे जगावे, म्हणजे प्रामाणीकपणे जगावे. आपण म्हणतो शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात. आजच्या जीवनात शिवाजी कुणालाही परवडणार नाही.

अवर्गिकृत

दलित रंगभूमी – दलित नाट्यचळवळ वर्णनात्मक प्रवास

Category:

 

दलित रंगभूमीचे पहिले नाटक तृतीय रत्न (1855) की जे महात्मा फुले यांनी लिहिले आहे. या नाटकाचा विषय ब्राह्यणांनी जे देवाच्या नावे गैरसमज व अंधश्रद्धा प्रस्थापित केल्या होत्या त्या विरुद्ध प्रहार करणारे हे नाटक होय.

अवर्गिकृत

उत्क्रांती

Category:

 

माणसातल्या मर्यादा संपवण्यासाठी आणि त्याला एक परिपूर्ण बनवण्याचा घाट एक शास्त्रज्ञ सुरु करतात निसर्गाच्या विरुद्ध जावून निसर्गाला आव्हान करण्याचा प्रयोग ते मांडतात त्यात ते यशस्वी होतात का? कृत्रिमरीत्या उत्क्रांती शक्य आहे का आणि तिचे परिणाम काय असतील? माणूस खरच निसर्गाला आव्हान देवू शकेल का? मी प्रेषित कुलकर्णी सादर करत आहे उत्क्रांती !!!!