योगा …हमसे नही होगा ! ( बेवड्याची डायरी – भाग ११)
Category:
अवर्गिकृतमाझा व योगाभ्यास यांचा छत्तीसचा आकडा होता पूर्वीपासून .. लहानपणी मी व्यायाम वगैरे खूप केलाय ..जोर ..बैठका .. अशा गोष्टी मी केल्या होत्या ..पुढे सगळे सुटले .. भलतेच सुरु झाले होते .. योग्याभ्यास म्हणजे ऋषीमुनींनी करायची गोष्ट असे माझे ठाम मत होते ..सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातील या गोष्टी असल्या तरी ..आपल्याला काही मोठे योगी बनायचे नाही ..या विचाराने मी योगाभ्यासापासून चार हात दूरच राहिलो होतो ..