रामायण ऑनबोर्ड
Category:
अवर्गिकृतत्यावेळेस जहाजावर इंटरनेट आणि फोनची सुविधा आमच्या त्या जहाजावर उपलब्ध नव्हती. जहाजावर कामावरून सुट्टी झाली आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांची जेवणे आटोपली की एकमेकांशी गप्पा मारणे, हिंदी गाणी किंवा पिक्चर बघणे याशिवाय मनोरंजन करण्यासाठी इतर काही साधने नव्हती. आमच्या बत्ती साबकडे महाभारत आणि रामायण या दूरदर्शनवर चालणाऱ्या मालिकांचे सगळे भाग असणाऱ्या डी व्ही डी होत्या. संध्याकाळी साडे सात वाजता क्रू स्मोक रूम मध्ये टी व्ही वर रामायण ची डी व्ही डी लावली जात असे. रोज एक एक भाग बघितला जायचा.