तंबी दुराईंशी एक (लंबी) मुलाखत
Category:
अवर्गिकृततंबी दुराई यांचं ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर आता रविवारच्या सुट्टीचा अविभाज्य भाग बनलंय. या सदरातल्या विनोदाच्या आविष्करणातली विविधता आणि सातत्य हे वाचकांना अचंबित करणारं आहे. मराठी साहित्यातला विनोद संपलाय अशी हाकाटी करणाऱ्यांना हे सदर ही छानशी चपराकच आहे. विनोदी साहित्याचा आढावा घेणार्यांना दखल घ्यायला लावीलच अशी तंबी यांची ही कामगिरी आहे.