अवर्गिकृत

परण्या निघालो रे

Category:

 

असं काय माहित ऐन टाईमला मला टाय बांधता येणार नाही अन् तसं माहित असतं तर तो मी बस्त्यात घेतलाच नसता. मी सुटा बुटातले कपडे नेसून बराच वेळ झाला तयार होतो पण ती गळ्यातली लांब दोरी कधी आयुष्यात बांधण्याचा प्रसंग आलाच नव्हता म्हणून बराच सावळा गोंधळ उडाला!

अवर्गिकृत

वाढदिवस आणि जन्मोत्सव

Category:

 

लहानपणा पासूनच प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाचं एक कौतुक आणि नावीन्य असत तो दिवस म्हणजे फक्त आपल्या साठी साजरा केला जाणार याची अपूर्वाई असते . आमच्या लहानपणी ती असायची पण अगदी साध्या सरळ पद्धतीने म्हणजे ज्या कोणाचा वाढदिवस असेल त्या दिवशी बाबा आम्ही आबा म्हणतो ते पेढे घेऊन यायचे ते आणले कि संध्याकाळचं देवाची दिवाबत्ती व्हायची मग स्तोत्र जप झाला कि बाबा देवाजवळ पेढे ठेवून पहिला पेढा ज्याचा वाढदिवस त्याला भरवायचे .

अवर्गिकृत

माझा बाप शेतकरी

Category:

 

शेतकरी बाप…चारही पोर जन्माला आली ती कळती होईस्तोवर त्यांचं दवा पाणी, जर कळती झाली दोघे चालली एक मराठी शाळेत तर एक अंगणवाडीत दुसऱ्या दोघांचं आहेच ते दवापाणी..असच निसर्गाशी झुंझत करत, दिवसामागून दिवस, अन वर्षामागून वर्षे हळूहळू उलटतात,न अखेर तो दिवस उजाडतो जेव्हा पदरात जगासाठी धनाची पेटी असणारी कदाचित त्या बापासाठी पण…ती धनाची पेटी म्हणजेच बापाची बेटी जेव्हा उपवरात येते तेव्हा नकळत बापाच्या काळजात चर्रर्रर्रर्र होतं.. इथपर्यंतच शक्य होत मी केलं आता इथून पुढे मी काय करू?? असा हतबल झालेल्या बापासमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं.

अवर्गिकृत

बदलणारं अस्तित्व

Category:

 

तिच्या घरापासून थोडी लांब एक छानशी जागा होती. तिथे भरपूर आणि उंच झाडं, झाडांना लपेटलेल्या वेली, त्यावरील वेगवेगळ्या रंगाची, गंधाची फुलं आणि या सगळ्यावर मुक्त विहार करणारे, किलबिल करणारे पक्षी. या सगळ्या गोष्टी जेवढ्या ठळक तेवढंच त्यांच्या विरुद्ध असणारा एक डोहं ही होता तिथे.

अवर्गिकृत

बाळासाहेबांच्या स्वाक्षरीची बॅट

Category:

 

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी अनेकांकडे असतील. माझ्याकडे त्यांची अशी एक आठवण आहे जी कदाचित कोणाकडेही नसेल.. माझ्यासाठी ती अक्षरश: अमूल्य आहे. 

अवर्गिकृत

ब्लु मुन

Category:

 

कॅनडाच्या व्हिफेन हेड पोर्ट मधुन आमचे जहाज निघणार होते. जहाजावरील सगळं ऑईल डिस्चार्ज व्हायच्या तासभर अगोदर ‘प्रोसिड टोवर्ड्स नायजेरिया’ असा कंपनी कडून मेसेज आला होता.

अवर्गिकृत

शाळेचा पहिला दिवस

Category:

 

शाळेचा पहिला दिवस व्हता. मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.एंक्याचा आज शाळचा पह्यलाचं दिवसं आसल्यानं पाहाटचं उठून आंघुळ करून त्ये सगळ्या देवायच्या पाया पडूनं आलतं.

अवर्गिकृत

नकोसे असे काही

Category:

 

जीवनात जशा काही गोष्टी हव्याहव्याशा वाटतात ,तशा काही नकोशा वाटतात.प्रत्येकाच्या बाबतीत दोन्हीही भिन्न असू शकतात.ज्याचे त्याचे ते स्वातंत्र्य असते. मतभिन्नता असतेच.

अवर्गिकृत

काँट्रॅडिक्शन

Category:

 

जहाजावर सहकाऱ्यांकडून (बऱ्याच वेळा पदाने वरिष्ठ) खाण्याच्या बाबतीत नेहमी येणारा अनुभव आणि एका स्टेशनवर पाहिलेल्या एका प्रसंगातील विरोधाभास. जहाजावर महिन्याला हजारो डॉलर्स किंवा एका हाताची पाचही बोटं मोजायला कमी पडावीत एव्हढे लाख रूपये पगार घेणारे सहकाऱ्यांची कीव वाटावी आणि वयाची एंशी ओलांडलेल्या एका गरीब आजीच्या हातातील घास पाहून मन हेलावणारा प्रसंग. शेळ्या मेंढ्या आणि गुर ढोरं गवत झाडाचा पाला आणि राखण नसलेल्या शेतातील भाजीपाला पीकं खातात.

अवर्गिकृत

समाजव्रत

Category:

 

सत्यनारायणाचं व्रत’ हा अनेकांच्या भक्तिभावाचा विषय तर अनेकांच्या चेष्टेचा. देवधर्म, सणवार या गोष्टींतील निरर्थक रूढींकडेच ज्यांचं लक्ष जातं, त्यांच्या दृष्टीनं हा चेष्टेचाच विषय. पण अध्यात्माच्या गूढ चर्चेत रमणाऱ्यांच्या दृष्टीनेही हे ‘काम्य व्रत ! ‘ म्हणजे कमी महत्त्वाचंच एकदा कशावरून तरी विषय निघाला आणि मी म्हटलं, ‘काही गोष्टी खरंच कळत नाहीत हं. ‘