Shri Vinayak Atre is a retired Chief Architect of Government of Maharashtra. He writes as a passion and most of his writing is for children
कावळे (कथा) – भाग 3
Category:
साहित्य - ललितठरल्याप्रमाणे मी खाँसाहेबांच्या टीम बरोबर गोव्याला गेलो. त्या समारंभासाठी खाँसाहेबांनी माझ्यासाठी अन्वरसारखाच सुंदर जोधपुरी ड्रेस घेतला होता. विमानतळावर उतरल्यापासून आमचा ताबा ‘पंचरंग’च्या गोवा शाखेने घेतला होता.
आणि इथेच, माझा वासंतीशी परिचय झाला. पाहता क्षणीच माझ्या मनीची राजकुमारी, हीच असे मला वाटले. अत्यंत तरतरीत, बोलके डोळे, गोरीपान, हसतमुख असे तिचे व्यक्तिमत्त्व पाहता क्षणीच प्रेमात पडावे असे होते. गोव्याच्या सर्व व्यवस्थापनाचे काम तिच्याकडेच होते. संपूर्ण कार्यक्रमात खाँसाहेबांच्या आग्रहानुसार माझ्याकडे खास लक्ष पुरविऱ्यात येत होते. मला अगदी लाजल्यासारखे झाले पण त्यामुळे एक मात्र झाले वासंतीचा सहवास मला पदोपदी मिळत होता. खाँसाहेबां