व्यक्ती-परिचय

‘जनकवी’ पी सावळाराम

Category:

 

पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे.

व्यक्ती-परिचय

ट्रिक फोटोग्राफी व स्पेशल ईफेक्ट्सचे जनक बाबूभाई मिस्त्री

Category:

 

आपल्या हिंदू संस्कृतीतील ‘पौराणिक’ ग्रंथातील प्रत्येक कथेचा पाया हा चमत्कारावरच रचला गेला आहे. देवांचे अवतार, प्रकटदृश्ये, त्यांची दैवीरूपे हा सर्व भाग काल्पनिक असला तरीही त्याला मूर्तरूप दिलं ते ‘बाबूभाई मिस्त्रीं’नी.

व्यक्ती-परिचय

प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेलचे मालक जगन्नाथ शेट्टी

Category:

 

वयाच्या १७ व्या वर्षी १९४९ साली जगन्नाथ शेट्टी पुण्यात आले आणि हॉटेल वैशाली मध्ये काम करण्यास सुरूवात केली. हॉटेल आपलं स्वत:चं असल्यासारखं ते मेहनत घेऊन काम करत होते. पहाटे पासुन ते रात्री उशीरापर्यंत हॉटेलमध्ये सर्व कामं ते पाहात असत.त्यांनी १९५१ मध्ये ‘कॅफे मद्रास’ हे रेस्टॉरंट सुरू केले. त्यानंतर मद्रास हेल्थ होम व वैशाली हॉटेल सुरू केले.

व्यक्ती-परिचय

हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

Category:

 

आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. ‘बालगंधर्व’सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे.

व्यक्ती-परिचय

गायक नंदेश उमप

Category:

 

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर वयाच्या आठव्या वर्षी नंदेश रंगमंचावर गायला उभा राहिला. परिणामी ‘ये दादा आवार ये…’ म्हणणाऱ्या कोळणीपासून ते ‘नाय बा किस्ना असून उपकाल, संगत तुजी नाई बली ले’ म्हणणाऱ्या पेंद्याच्या बोबड्या गवळणीपर्यंत लोकशाहिरांची गायकी नंदेशने सहीसही उचलली.

व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर

Category:

 

हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते.

व्यक्ती-परिचय

श्रीपाद रेडीओ’ चे मालक श्रीपाद कुलकर्णी

Category:

 

श्रीपाद कुलकर्णी यांचे स्वतःचे श्रीपाद रेडिओ या नावाचे आपले स्वतःचे राऊड-द-क्लॉ क (२४ तास चालू असलेले) इंटरनेट रेडिओ स्टेशन आहे. तिथे बॉलिवूड गाण्यांचे, दिन विशेष वरील संगीताचे कार्यक्रम आणि भक्ती संगीताचे कार्यक्रम चालू असतात.

व्यक्ती-परिचय

थोर संत गाडगे महाराज

Category:

 

अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.