ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगेली जवळपास पन्नास वर्षे त्या व्रतस्थपणे कविता लिहितायत. या पन्नास वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. ‘दिगंत’ (१९८१), ‘तरीही’(१९८५), ‘दिवसेंदिवस’(१९९२), ‘वाळूच्या पात्रांत मांडलेला खेळ’(२००५) आणि ‘कदाचित अजूनही’(२०१७). या संग्रहांतून प्रामुख्याने आत्मपर कविता आलेली आहे. या कवितेचा केंद्रबिंदू विशेषत्वाने स्त्रीच राहिलेली आहे.