सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून सध्या त्यांची एकूण संपत्ती २२.७ अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी भुलेश्वर चाळमधील छोट्याशा खोलीत आपला बिझनेस सुरु केला होता. मुकेश व अनिल यांचे बालपण देखील याच खोलीत गेले. आज मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये राहात असले तरी त्यांना भुलेश्वर चाळीतील घराचा विसर पडलेला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये मुकेश अंबानी यांनी भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील फ्लॅटचा खास उल्लेखही केला होता.मुकेश अंबानींकडे तीन खासगी विमाने आहेत. त्यात ३३० कोटींचे एअरबस ३१९ कॉपरेरेट जेट, ४०१ कोटी रुपयांचे बोइंग बिजनेस जेट-२ आणि ९९ कोटी रुपयांचे मिनी जेट फॉल्कन ९०० ईएक्सचा समावेश आहे.