बार्बीडॉलची निर्माती रुथ हँडलर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteखेळण्यांच्या दुनियेत दीर्घकाळ दबदबा असलेली आणि आबालवृद्धांना आजही मोहिनी घालणारी बार्बी बाहुली साठ वर्षांची झाली. सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची अतिशय कमनीय बांध्याची ही बार्बी आजही बाहुली साम्राज्यातील सम्राज्ञी मानली जाते. या काळात तिची अनेक रूपे सामोरी आली. गोरीपान पासून काळी कुट्ट अश्या विविध वर्णात ती दिसली असली तरी आजही सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्याची तिची प्रतिमाच अधिक लोकप्रिय आहे.