चित्रपट कथा – पटकथाकार आणि संवाद लेखक यशवंत रांजणकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteचित्रपट विषयक साप्ताहिक चित्ररंग चे रांजणकर हे काही काळ कार्यकारी संपादक होते. त्यांची पन्नास हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बैरागपाडा हे पुस्तक तसेच लॉरेन्स ऑफ अरेबिया, आल्फ्रेड हिचकॉक, वॉल्ट डिस्नी – द अल्टिमेट फँटसी यांची त्यांनी लिहिलेली चरित्र वाचकप्रिय ठरली. रांजणकरांची शैली वाचक-स्नेही होती. लॉरेन्स ऑफ अरेबिया या पुस्तकाने मराठी वाचकविश्वाला सर्वस्वी अपरिचित असलेल्या टी. ई. लॉरेन्सचं हे चरित्र त्यामुळे अथपासून इतिपर्यंत वाचनीय झाली.