अमर चित्रकथाकार अंकल पै
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपहिल्या भारतीय कॉमिक चित्रमालिकेचे निर्माते ही अंकल पै म्हणजेच अनंत पै यांची प्रमुख ओळख. ही कॉमिक चित्र मालिका अमर चित्र कथा या नावाने जगप्रसिद्ध आहे. वयाच्या बाराव्या वर्षी ते मुंबईत आले, तसा त्यांचा जन्म कर्नाटकातील करकाला गावचा. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांचे आई वडिल वारले. त्यानंतर त्यांनी मुंबईचा रस्ता धरला.