साहित्य - ललित

गंगेच्या उगमापाशी- गोमुख -भाग १

Category:

 

प्राचीनकाळी इक्ष्वाकु वंशातील महापराक्रमी, प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणारा पुण्यशील चक्रवर्ती सगर राजा राज्य करत होता. या सगर राजाला साठ हजार पुत्र होते व ते सर्वजण आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. एके दिवशी सगर राजाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली. त्याने ऋषीमुनींचा सल्ला घेतला. सर्वांनाच ही कल्पना आवडली. यज्ञाची सिद्धता झाली. अश्वमेध यज्ञाचा घोडा सिद्ध झाला.

साहित्य - ललित

प्रयोगशील निर्माता – शांताराम शिंदे

Category:

 

पहिल्या नाटकात अपयश येऊनही ते सतत नाट्यनिर्मिती करत राहिले. नवीन कलाकारांना संधी, जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन, मल्टिस्टार नाटक या आताच्या संकल्पना त्यांनी पाच वर्षांपूर्वीच वापरल्या होत्या. ‘निर्मल’ संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले. पण शिंदेसाहेब कधीही पुरस्कार सोहळ्याला, पार्ट्यांना हजर राहिले नाहीत. त्यांनी स्वतला कधीही मिरवून घेतलं नाही. असा हा आगळावेगळा निर्माता 16 जुलै 2012 रोजी आपल्यातून निघून गेला.

साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५९ – भगिनी निवेदिता

Category:

 

त्यांनी आपल्या शाळेतून ‘वंदे मातरम्’ चे गायन सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. लॉर्ड कर्झन ह्यांच्या विचारांची पोल सगळ्यांसमोर उघडी केली, ते नेहमी पाश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करत आणि पूर्वेकडील संस्कृती ला कमीपणा देत. भगिनी निवेदित्यांच्या प्रयत्नांनी लॉर्ड कर्झन ला सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली. भारतीय लोकांमध्ये स्वदेशीचा प्रचार, प्रसार केला.

साहित्य - ललित

भारतमातेच्या वीरांगना – ५८ – सरला बहन

Category:

 

१९३२ साली भारतात आल्या. भारतात आल्यावर दोन वर्षे उदयपूर येथे एका शाळेत काम केले. त्यानंतर त्या गांधीजीसमवेत सेवाग्राम येथे आल्या. तिथे त्यांनी ८ वर्ष काम केलं. पण वर्ध्याचे वातावरण त्यांना फार पोषक ठरले नाही, इथल्या उन्हाने त्यांची वारंवार तब्येत बिघडू लागली, मग त्या कसोली, अलमोडा येथे आल्या. कुमाऔ घाटीतल्या महिलांसाठी त्यांनी फार मोठे काम उभे केले. त्याच बरोबर जंगल तोडी विरोधात सुद्धा मोठी मोहीम राबविली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात कुमाऔ जिल्ह्या त्यांनी एकत्रित आणला, तिथल्या लोकांमध्ये स्वातंत्र्यज्योत पेटविली. त्यांचे नेतृत्व केले, परिणामी त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. त्याचा अवधी एकूण दोन वर्षांचा होता.

साहित्य - ललित

रंग अवकाशाचा मुक्तयात्री – अशोक साठे

Category:

 

आमच्या मेंदूच्या एका कप्यात चक्रावर्तासारखा तू का भिरभिरत असतोस? काही निमित्तांनी (आता नाट्यसंमेलन) अंधारानंतर सायक्लोरामावर पडलेल्या लख्ख पहाट प्रकाशासारखा का आठवत राहतोस? जसाच्या तसा! तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्यक्ष क्षण तळहातावर स्वातीच्या थेंबाचा मोती ठेवावा, तसा मनचक्षूसमोर सजीव होऊन उलगडत राहतोस (हे जरा शब्दबंबाळ वाटतंय ना?) नाटकाची संहिता वाचताना हळूहळू अस्पष्ट, पण मग साकार दिसणाऱ्या पात्रासारखा, प्रसंगासारखा (हे तुला जवळचं वाटेल).