साहित्य - ललित

फ्युचरिस्टिक स्पेस टुरिझम

Category:

 

सूर्यमाला सोडून आता आम्हाला पृथ्वीवरची बाराशे वर्षे होऊन गेली होती. सध्या अंतराळाच्या ज्या क्षेत्रातून आम्ही जात होतो तिकडे फक्त धुळीचे प्रचंड ढग होते, प्रकाश दर्शन होऊन जवळपास दिडशे वर्षे लोटली होती.

लेखसंग्रह

सहकारी तत्त्वावर ग्रंथ प्रकाशनाचा प्रयोग

Category:

 

ग्रंथ प्रकाशन आणि वितरण क्षेत्रात सहकारी तत्वावर कार्य करणान्या ‘साहित्य प्रवर्तक सहकारी संस्था, कोट्टायम’ या केरळ राज्यातील संस्थेच्या कार्याचा तपशील पुढे दिला आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थित ग्रंथव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर या प्रयोगाचे कार्य लक्षात घेणे अगत्याचे आहे असे वाटते.

साहित्य - ललित

साहित्य सुगंधासारखं घरात घुसलं पाहिजे

Category:

 

१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री व. पु. काळे यांनी लिहिलेला लेख 

साहित्य - ललित

ऋण सद्गुरूचे

Category:

 

संत कसे बोलतात, कसे चालतात, निरनिराळ्या परिस्थितीत कसे वागतात, कसे निर्भय असतात, कसे निःस्पृह असतात, किती निरिच्छ, किती मृदू, परंतु किती निश्चयी, कसे निरहंकारी, कसे सेवासागर, किती निरलस, किती क्षमी, कसे त्यांचे वैराग्य, कशी निर्मळ दृष्टी, कसा विवेक, कसा अनासक्त व्यवहार, – हे सारे त्यांच्या सहवासात नित्य राहिल्यानेच समजत असते.

साहित्य - ललित

जीवनाहून सुंदर

Category:

 

गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे विचार गोड आणि भव्य आहेत. मृत्यूची भीषणता आपल्या संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ. मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप. जीवन आणि मरण हे दोन्ही वस्तुतः एकरूपच आहेत. मरण नसते तर जग भेसूर दिसले असते.

साहित्य - ललित

आत्मतत्त्व

Category:

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विसाव्या शतकात जीवन जगणाऱ्या माणसाची नाडी ओळखली, प्रगत समाजातील प्रश्न त्यांनी पाहिले आणि विज्ञानाची घोडदौड जाणून घेतली. संत परंपरेचा मूळ धागा न सोडता त्यांनी-‘अध्यात्म और विज्ञान से सब हो सुखी सहयोग समता से यह सृष्टी बने स्वर्गही’ अशी गुरुदेवाला विनम्र प्रार्थना केली.

साहित्य - ललित

आद्य मराठी ग्रंथ संग्रहालयाचे जनक – वि. ल. भावे

Category:

 

ठाणे शहरातील साहित्यिक चळवळीचा पाया वि. ल. भावे यांनी १ जून १८९३ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना करून घातला.

साहित्य - ललित

शब्द सूरती योग

Category:

 

संत कबीरांच्या मते आत्मा अगम्य आहे. तो सांसारिक आणि भौमिकतेचा विषय नाही. तो आपल्या चर्म चक्षूने पाहण्याचा अथवा फक्त कानाने ऐकण्याचा विषय नाही तर दिव्य दृष्टीने अनुभव घेण्याचा विषय आहे. त्यांनी साधकांना ज्योती स्वरूपाच्या दर्शनात न थांबता पुढे नाम निःअक्षर (परमात्मा) पर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिलेला आहे.

साहित्य - ललित

शब्द बापुडे केवळ वारा

Category:

 

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणून ओळखली जातात. पैकी पृथ्वीच्या आधारानेच सगळे जीवन चालते आणि आप म्हणजे पाणी हे तर मूर्तीमंत जीवनच. तेजोमय लोहगोल म्हणजे भगवान् सूर्यनारायण वायू आणि आकाश या दोन गोष्टींचा संदर्भ सहजासहजी लागत नाही.

साहित्य - ललित

कोण जिंकले?

Category:

 

शांतपणे चालणारा कुत्रा बहुधा हसत असावा. मनातल्या मनात म्हणत असावा – ‘’Valentine Day ला आपण बाजी मारली. समोरून जाणार्‍या आपल्या ‘श्वान मैत्रीणीला’ आपण आधी भेटलो. अब मालिक जाने और उसकी Girl Friend जाने. मालक ‘अष्टावधानी’ तर मी ‘प्रसंगावधानी’.’’