साहित्य - ललित

निसर्गरम्य तळकोकणचा  प्रवास – आरामदायी  तेजस एक्सप्रेसने

Category:

 

कोकणचा निसर्ग रसिक पर्यटकाना सतत बोलावत असतो. त्यातही  ज्याला रेल्वे प्रवास प्रिय त्यांच्यासाठी तर पर्वणीच. विशेषतः खवय्यांना  तर मांडवी एक्सप्रेस चांगले २०-२५ पदार्थ पेश करते. हिरवा गार निसर्ग,लाल मातीचे डोंगर, घाट मार्गात अनेक बोगदे. रत्नागिरी स्टेशन आखीव नीटस मनात भरणारे. स्टेशन बाहेर रेल्वे बांधणीत मृत्यू पावलेल्या कर्मचारी वर्गाच्या स्मृतिस्मारकासमोर आपण नतमस्तक होतो.

साहित्य - ललित

यडा.. पणा

Category:

 

सातारा स्टँडवर सरवांची वर्दळ सुरू असल्यानं स्टँड बहरल व्हती,कॉलेज ची गावठी पोरं उगाचच उनाडक्या करीत इकडून तिकडं फिरत व्हतं..त्यासनी असं वाटत व्हतं जणू सगळ्या जगाची अक्कल त्यासनी आलीय…एक एका गावची एस टी येत व्हती तसं पोरा अन पोरींचा घोळका लगबगीनं गाडीकड धाव घेत एकमेकांसनी म्होर ढकलत जात व्हता.

साहित्य - ललित

हिंदी चित्रपटातील  दिपावली गीते…….

Category:

 

चित्रपटाचे तंत्र आणि कथा जसजशा बदलत गेल्या तसतसे सांस्कृतिक संदर्भही वेगळ्या प्रकारे सादर होऊ लागले. चित्रपटातील दिवाळी गाणी नवनवीन साज लेवून येतच राहिली. होम डिलेव्हरी, आमदानी अठ्ठनी खर्चा रूपया, तारे जमीन पर, मोहबबते, कभी खुशी कभी गम वगैरे चित्रपटातुन दिवाळीची गाणी अधिक भरजरी व लखलखीत रूपात अवतरली. दिवाळी गाण्याचं हे भव्यदिव्य रूप मात्र स्वप्नां सारखं वाटू लागलं….लेड इलेक्ट्रीक दिव्यांच्या चकचकीत रोषणाईत पणत्यांचा उजेड हरवला. दिव्याने दिवा पेटवणाऱ्या संस्कृतीतलं तेवणारं मन आता मात्र शोधताना अडचण येत आहे.

साहित्य - ललित

मी व्यायाम करतो

Category:

 

ते वळण माझ्या आयुष्याला दिशा देणारे ठरले.’ कित्येक मोठी माणसे हे वाक्य त्यांच्या आत्मचरीत्रात बिनदिक्कत छापत असतात. छापील धंदे. एकदा का तुम्ही आत्मचरीत्र लिहायच्या लायकीचे झाले तर मग तुम्ही काय लिहिता याला काही अर्थ उरत नाही. माझ्या आयुष्यात एक जरी वळण आले असते ना तर मी आतापर्यंत दोन चार आत्मचरीत्र लिहून मोकळा झालो असतो.

साहित्य - ललित

दिवाळी दिवाळी आ ssss ली 

Category:

 

दरवर्षीप्रमाणे ‘दिवाळी’ आली, पण ती अगदी आजच आली आहे याच्यावर विश्वासच बसत नाही, मला भिंतीवरच्या ‘कालनिर्णय’ वरून समजलं. पण तरीही माझ्या ‘झोपी गेलेल्या आठवणी जाग्या झाल्या’.

साहित्य - ललित

बंधन…

Category:

 

अशी कितीतरी अदृश्य बंधनं आपल्या अवती-भोवती तयार झालेली असतात ती तोडु म्हणताही आपल्याला तोडता येत नाहीत. कडक लाकुड पोखरुन काढणारा भुंगा कमलदलाच्या पाकळ्यांच्या बंधनात स्वत:ला कोंडुन घेतो. काही बंधनं अशीच असतात, जी आपल्याला तोडवत नाहीतच मुळी.

साहित्य - ललित

माझा चंद्र…

Category:

 

एक ना अनेक भावना चंद्राशी जोडल्या जातात. जसे चंद्र उगवल्यावर ईद साजरी होते, तर चंद्र दर्शनानंतर उपवास सोडला जातो. चंद्र तोच असतो, त्याच्याशी जोडली जाणारी नाती मात्र निरनिराळी असतात. बाल्कनीतल्या खिडकीतून डोकावणारा चंद्र वेगळा असतो आणि झोपडीच्या फाटक्या कपड्यांतून दिसणारा चंद्र निराळा भासतो. कधी तर भाकरीतही चंद्र शोधला जातो. चाळणीतून चंद्र पाहिला जातो.

लेखसंग्रह

आपण सारे एक झालो…

Category:

 

पंचतत्व. अग्नि, वायू, पाणी, पृथ्वी, तेज ही तत्व मिळून पंचतत्व तयार होतं. मानवी शरीर देखील याच तत्वांनी बनलेलं. शरीर याच पंचतत्वाच विलीन होऊन जातं. शरीर विलीन होतं म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या रुपात पुन्हा मागे उरतं. कशात तरी समावून जातं. काही तरी बनून जातं. याचाच अर्थ असाच ना की आपण सारे एकमेकांपासुन तयार झालेलो आहोत.

साहित्य - ललित

एम एच बारा आणि मी

Category:

 

मराठी माणसाने अशा कितीही शहरांमधे झेंडे गाडले असले तरी मराठी माणसासाठी पुणे म्हणजे पुणेच. त्या एम एच बारा अशा पाट्या दिसल्या की मराठी माणसाचा उर कसा भरुन येतो. मराठी माणूस हा कधीतरी पुण्यात येउन गेलेला असतो किंवा त्याचे कुणीतरी पुण्यात येउन गेलेले असते. पुण्यात आला म्हणजे मित्रांमधे छापायला एखादा अनुभव हा आलाच.