लेखसंग्रह

चालणे आणि चालणे…

Category:

 

अनादी कालापासून आपण चालत आहोत. अगदी रामायण काळ जरी म्हटला तरी सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र थेट चौदा वर्ष चालत होते, वनवास होता ना. वामन अवतारात तीन पावलांत विश्व व्यापले गेल्याचे आपण ऐकत आलो आहोत. पांडवही बारा वर्षे वनवासात होते, चालतच असतील ना. थोडक्यात काय तर चालणे आपल्याला सुटलेले नाही. आपण सारेच चालत आहोत… चालतच राहणार आहोत.

साहित्य - ललित

सृष्टीकर्त्याचे अप्रतिम चित्र

Category:

 

डोक्यात प्रकाश पडला,जे माहित नाही ते तिमिर कारण अंधारत कुणाला काहीच दिसत नाही. तिमिराच्या आवरणात दडलेला विभु, अर्थात स्वयं प्रकाशित आत्मा अर्थात सृष्टी निर्माता परमेश्वर, कुणाला दिसणे शक्यच नाही.  त्याच सृष्टीकर्त्याचे चित्र सॉफ्टवेअरच्या  मदतीने काढले.

साहित्य - ललित

वरची खोली (कथा)

Category:

 

मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य  इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली …मी पण  साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून  प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी  माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या  साईटवर आलो.

साहित्य - ललित

माझा कविता लेखन प्रवास – भाग १

Category:

 

माझा लेखन प्रवास 1983-84 साला पासून सुरु झालेला आहे. सातत्य-सराव- स्वाध्याय ‘ ही लेखनाची त्रि-सुत्री आरंभापासून कायम आहे. आरंभी म्हणजे 1983 ते 1997 अशी 14 वर्ष मी फक्त कथा, लेख, बालकथा असे गद्य लेखन केले. परभणीच्या वास्तव्यात कवी आणि कविता सहवास घडत गेला आणि माझ्यातील कवीला आविष्कृत होण्यास अनुकूल वातावरण मिळाले.

साहित्य - ललित

आभास (दिर्घ कथा)

Category:

 

अजयची बस रामगड थांब्यावर पोचली तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. रामगड हे एक छोटे तालुक्याचे गाव होते. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने आता थोडी विश्रांती घेतली होती. मात्र वातावरण कुंद होते व हवेत प्रचंड गारठा आला होता. बसच्या दिवसभराच्या प्रवासाने अजय खूप वैतागला होता.

साहित्य - ललित

अशी ही व्यापाराची तर्‍हा

Category:

 

कैरोमधल्या पिरॅमिडबद्दल शाळेत असल्यापासून कुतूहल होतंच. Chariots of Gods आणि इतर काही पुस्तकांमधून पिरॅमिड व तत्सम इतर अवाढव्य कलाकृतींबद्दल वाचून त्याविषयीचे आकर्षण वाढले. एवढे अवाढव्य काम कोणी केले असेल, कशासाठी केले असेल याची उत्सुकता निर्माण झाली. ‘चॅरिएट्स ऑफ गॉड’ मध्ये ब-याच आश्चर्यकारक जागांचा व बांधकामांचा उल्लेख आहे. हिस्ट्रीचॅनलवर तेंव्हा एक‘ एनशियंट एलियन्स ’म्ह्णून एक मालिकाही बघण्यात आली व नास्काच्या रेषा, पिरॅमिड्स, चीनची भिंत वगैरे ब-याच माहितीची भर पडली.त्यातल्या त्यात  पिरॅमिडस हे जरा जवळचे वाटले. म्हणून पिरॅमिडच्या तीव्र ओढीने आम्ही इजिप्तचा विचार करू लागलो म्हटले तरी चालेल.

साहित्य - ललित

फणस (लघु कथा)

Category:

 

डोंगरे डॉक्टरांचे म्हणणे लोकांना किती पटले कोणाक ठाऊक.कारण गाव तसे अंधश्रद्धाळू. भुता खेतांचे अस्तित्व मानणारी बहुतेक माणसे. महादूची ही हकीगत गावात सगळीकडे पसरली,  त्याला तिखट मीठ लाऊन शेजारच्या गावात पण पोचली आणी त्यानंतर जयरामचे भूत नंतर अनेकांना त्या रस्त्यावर वडाच्या झाडा जवळ सगळ्यांना दिसू लागले.

साहित्य - ललित

रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग

Category:

 

रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला. त्रिचूर वैद्यनाथन यांनी Working on SELF Realisation ह्या समूहावर एक लिंक सामायिक केली आहे. त्यातील कहाणीचे मराठी भाषांतर सादर करीत आहे. रामायणातील फारशी माहित नसलेली एक कथा

साहित्य - ललित

साठा उत्तराची कहाणी

Category:

 

पुणे येथील सुप्रसिद्ध `पद्मगंधा प्रकाशन’ चे प्रमुख आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष श्री अरुण जाखडे यांचे जीवनानुभव कहाणी त्यांच्याच शब्दात !