साहित्य - ललित

बाबू मोशाय – वो आज भी ‘करीब’ हैं !

Category:

 

शरीरयष्टी (सिक्स पॅक) वगैरे विना अभिनय करता येतो किंबहुना अभिनेत्याला सगळं चेहेऱ्यावरून आणि देहबोलीतून व्यक्त करायचं असतं, त्यासाठी पहिलवान असण्याची गरज नसते अशा काळातला राजेश खन्ना ! दिसायला सर्वसामान्य असणं हे त्याच्या भात्यातील प्रभावी अस्त्र होतं. अतिशय हळुवार ,नाजूक ,कोवळ्या अलवार भावना त्याच्या आवाजातून आणि चेहेऱ्यावरून व्यक्त व्हायच्या.

लेखसंग्रह

चकीत’ करणारी नाती !

Category:

 

“रामप्रसाद की तेरहवीं” पाहिला. काही दिवस आधी अशा कथेवर आलेला समांतर ” पग्लाईट (PAGGLAIT) पाहिला होता. एक मृत्यू आणि त्याभोवती तेरा दिवस मनाविरुद्ध फिरणारे कुटुंबीय, नातेवाईक ! त्यांच्यातील दऱ्या, वरवरची मलमपट्टी, अंतर्गत धुसफूस आणि अशा कर्मकांडात रस नसलेली (पण जबरदस्तीने ओढून आणलेली) नवी पिढी. मग ते तेरा दिवस जुनेपुराणे हिशेब चुकते करण्याकडे कल. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला “तेच तेच ” सांगणे, तोंडाला पदर धरून.

साहित्य - ललित

हमने तुमको देखा !

Category:

 

मित्र झळकीकरच्या बरोबर कॉलेजच्या पायवाटेवर ऋषीचा पाहिलेला पहिला पिक्चर ! (अंहं – बॉबी खूप नंतर पाहिला आणि जोकरही) तेव्हापासून याला आम्ही पाहिलं अगदी शेवटच्या “मुल्क ” पर्यंत ! सुमारे ४०-५० चित्रपट या कलावंताचे मी आजवर पाहीले असतील आणि एकच केलं – आमच्या देव्हाऱ्यात दाटिवाटीत त्याला बसविले , शेजारच्या अमिताभ नामक कुलदैवताला धक्का न पोहोचविता !

साहित्य - ललित

अलविदा नसलेली एग्झिट !

Category:

 

इथे दंतकथांच्या वदंता होतात. हे पुढच्या पिढ्यांना सप्रमाण सांगायची जबाबदारी आता आपली ! “इरफान ” नांवाची दंतकथा प्रत्यक्ष पाहिली याबद्दल स्वतःची पाठ थोपटून मी आता त्याचे न बघितलेले चित्रपट पाहणार आहे – तेवढंच माझ्या हाती आहे.

साहित्य - ललित

तुम अपना रंज ओ गम अपनी परेशानी मुझे दे दो !

Category:

 

१९६४ च्या “शगुन ” मधील खय्याम ने संगीतबद्ध केलेलं हे गीत त्याच्या पत्नीने (जगजीत कौर ने) गायलेलं ! गीतकार- हिंदीतला आजवरचा ऑल टाइम ग्रेट – साहीर ! (त्याच्या नंतर गुलज़ार , मग जावेद , मग निदा फाजलीं – ही माझी यादी )

साहित्य - ललित

चित्रपटांमधील “अढळ” स्मृतिचिन्हे !

Category:

 

चित्रपटातील कथानकाला ,संवादांना स्वतःचे असे स्थान असते. पण काही परिणामकारक प्रसंग त्या चित्रपटाचा पोत ३६० अंशातून बदलतात आणि कायमचे लक्षात राहतात. कथा पुढे तर नेतातच पण अभिनयाने जो अभिप्रेत असलेला संदेश देतात तो बराच काळ टिकतो. हिंदी चित्रपटांमधील मला आवडलेले चार प्रसंग-

साहित्य - ललित

तेरे मेरे बीचमे कैसा हैं ये बंधन !

Category:

 

” एक दूजें के लिये ” ने १९८१ साली धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या प्रत्येक आघाडीवर ( अभिनय, गीत, संगीत, पार्श्वगायन, गोव्याची नयनरम्य पार्श्वभूमी ) हा चित्रपट देखणेबल होता. “बॉबी” नंतर ची ही तुफान गाजलेली प्रेमकथा (शेवट सुखांत नसला तरीही). कमल आणि रती ही नवोदित फ्रेश जोडी देणारा हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी मन तृप्त होत नाही.

साहित्य - ललित

लिंबलोण उतरू कशी ?

Category:

 

“एकटी ” मधल्या सुलोचना दीदी कायम “आई “दिसल्या – मुलामध्ये आणि संकटांमध्ये ठाम उभ्या असलेल्या आईसारख्या ! गीतातील भाव चेहेऱ्यावर साकार करणाऱ्या ! सकाळी सकाळी सुमन कल्याणपुरांच्या साय भरल्या आवाजात हे गाणं ऐकलं.

लेखसंग्रह

सुनीताबाई – सौदामिनी !

Category:

 

सुनीता बाईंशी मी दोनदाच फोनवर बोललो आहे- वालचंद ला असताना आम्ही ” तुझे आहे — ” बसविले होते. मी त्यांत “आचार्य ” ची भूमिका केली होती. मनाच्या एका तारेत पुलंना पत्र लिहिलं – ” तुमच्या या मानसपुत्राला आशीर्वाद द्या.” उत्तर आलं नाही. फोन लावला, पलीकडून सुनीताबाईंचा आवाज – ठाम नकार आणि फोन कट !

साहित्य - ललित

पिंजरा – प्रवाहपतितांचा प्रवाह !

Category:

 

डॉ. लागूंसारखा बलदंड अभिनेता या चित्रपटाने दिला. त्यांनी पूर्ण ताकदीनिशी आपले पात्र रंगविले. संध्याचे करियर उताराला लागले होते, ते पुन्हा या चित्रपटामुळे थोडेसे गतिमान झाले.