शहरे आणि गावे

गडचिरोली जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

जिल्ह्यात सुमारे १५ टक्के भाग लागवडीखाली आहे. एकूण १६,८९०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ११,३९०० जिरायती, तर उर्वरीत म्हणजे ५५००० हेक्टर बागायती आहे.

शहरे आणि गावे

गडचिरोली जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती

Category:

 

डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे – आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला लोकबिरादरी प्रकल्प. डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी सौ मंदा आमटे हे हा प्रकल्प हेमलकसामधील नागेपल्ली, भामरागड येथे गेली ३५ वर्षे चालवत आहेत.

शहरे आणि गावे

गडचिरोली जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

गडचिरोली जिल्ह्याचा बराचसा भाग जंगलांनी व्यापला असल्याने येथील आदिवासींची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो.

शहरे आणि गावे

गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. सध्या गडचिरोलीचे १२ तालुके आहेत, पण विभाजनापूर्वी या भागात गडचिरोली व सिरोंचा हे दोनच मोठे तालुके अस्तित्वात होते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा भाग चंद्रपूरमध्येच समाविष्ट होता.

शहरे आणि गावे

गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

चामोर्शी – या तालुक्यातील मार्कंडा हे प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. येथे विलक्षण नाजूक कोरीव काम असलेले, महादेवाचे हेमाडपंती देऊळ आहे. येथील देवास मार्कंडदेव असेही म्हणतात. याच्या भोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.

शहरे आणि गावे

गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

गडचिरोली जिल्ह्याला सर्वात जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके राज्य महामार्गांनी जोडले आहेत. चंद्रपूर-गोंदिया हा लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.

शहरे आणि गावे

गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत काही उद्योग या जिल्ह्यात केले जातात. वडसा येथे खत उद्योग आहे त्याचबरोबर भात गिरण्यादेखील आहेत.

शहरे आणि गावे

गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

प्राचीन काळात गडचिरोली परिसर नाग व माणवंशीय राजांच्या अधिपत्याखाली होता. सध्याच्या आरमोरी तालुक्यातील वैरागड व धानोरी तालुक्यातील टिपागड ही पूर्वीच्या काळातील राजवटींची प्रमुख केंद्रे होती.

शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्हा

Category:

 

कोळसा व चुन्याच्या खाणींसाठी चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा आश्रय व ज्यांचे अनमोल कार्य ज्या जिल्ह्याला लाभले तो हा चंद्रपूर जिल्हा.

शहरे आणि गावे

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय:

Category:

 

चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक ‘भात’ हे आहे. पूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते.