लेखसंग्रह

वॉशिंग मशीन

Category:

 

वॉशिंग मशिन शिवाय कुठल्याही गृहिणीचे काम चालू शकत नाही. कपडे धुण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. आता त्यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचा आकारही आटोपशीर आहे.

लेखसंग्रह

अल्पायुषी कडी

Category:

 

शनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत.

लेखसंग्रह

हिमनद्यांचा इतिहास

Category:

 

पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे.

लेखसंग्रह

रेल्वेद्वारे मालवाहतूक आणि रोरो सेवा

Category:

 

मालाने भरलेले ट्रक रेल्वेमार्फत पाठविणे ही कल्पना तुलनेने नवीन आहे. भारतात या सेवेची सुरुवात १९९९ मध्ये कोकण रेल्वेने केली. याला रोरो ऊर्फ रोल ऑन-रोल ऑफ असे म्हणतात.

लेखसंग्रह

स्टेनलेस स्टील

Category:

 

स्टेन म्हणजे डाग. ज्यावर डाग पडत नाहीत असे पोलाद म्हणजे स्टेनलेस स्टील. त्याच्या न गंजण्याच्या गुणधर्मामुळे स्टेनलेस स्टीलचा रासायनिक उद्योग, समुद्रातील बांधकामे, पाण्यातील बांधकामे अशा बऱ्याच उद्योगांमध्ये मोठया प्रमाणावर वापर होतो. स्वयंपाकघरातसुद्धा स्टेनलेस स्टील वापरले जाते.

लेखसंग्रह

गंजण्यापासून संरक्षण

Category:

 

खिळे, कुंपणाच्या तारा, विजेचे खांब या सर्व नवीन वस्तू असताना चकाकतात, पण त्या कालांतराने निस्तेज होतात आणि त्यांवर एक लाल रंगाचा थर चढतो. हा थर म्हणजे लोखंडाचे ऑक्साईड असते.

लेखसंग्रह

लोखंड व पोलाद यातील फरक

Category:

 

लोह हे नाव आपण १०० टक्के शुद्ध मूलद्रव्याला दिले तर लोखंड आणि पोलाद ही त्याची दोन महत्त्वाची संमिश्रे आहेत. लोह हा धातू आणि कार्बन हा अधातू यांच्या मिश्रणातून लोखंड आणि पोलाद तयार होतात. कार्बनव्यतिरिक्त या संमिश्रांमध्ये सिलिकॉन आणि मँगेनीजही असते.

लेखसंग्रह

खनिजापासून लोखंड कसे मिळवतात?

Category:

 

आधुनिक जगात खनिजापासून लोखंड मिळवण्याची प्रक्रिया ब्लास्ट फर्नेसमध्ये केली जाते. चित्रात दाखवलेल्या या भट्टीच्या सर्वात फुगीर भागात सर्व बाजूंनी तांब्याच्या नळ्या आत सोडलेल्या असतात. त्यातून उच्च दाबाची हवा (ब्लास्ट) आत सतत सोडली जाते. यावरून या क भट्टीला ब्लास्ट फर्नेस असे नाव मिळाले.

लेखसंग्रह

लोखंडाचा शोध कसा लागला?

Category:

 

खनिजापासून लोखंड बनविण्याच्या प्रक्रियेचा विकास होण्याआधी माणसाला लोखंड माहीत होते. पृथ्वीवर सापडणाऱ्या अशनीमध्ये एक काळ्या रंगाचा धातू मिळत असे. त्या काळात इजिप्तच्या लोकांनी त्याला काळे तांबे असे नाव दिले होते. हा धातू म्हणजे लोखंड आणि ६ ते ८ टक्के निकेल यांचे संमिश्र असे.

लेखसंग्रह

धातूंचा शोध

Category:

 

धातू हे सामान्यपणे वातावरणात घन स्वरूपात आढळतात. त्यांचे रंग वेगवेगळे असतात, पृष्ठभाग चकाकणारा असतो, स्पर्शाला थंड लागतात, उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात आणि त्यांच्यापासून पातळ पत्रे आणि लांब तारा बनवता येतात. पृथ्वीवर आतापर्यंत ८६ धातू शोधले गेले.