एअर कंडिशनर
लेखसंग्रह

एअर कंडिशनर

Category:

 

एअर कंडिशनर म्हणजे वातानुकूलन यंत्र हे रेफ्रिजरेटरसारखेच काम करते. एका ठिकाणची उष्णता शोषून ती दुसरीकडे नेऊन सोडते.

लेखसंग्रह

भारतीय वायुसेनेची सुरुवात

Category:

 

८ नोव्हेंबर, १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. पहिल्या सहा लोकांना वैमानिकी शिक्षणासाठी क्रॅनवेल येथे पाठविण्यात आले तर रेल्वेतून निवडलेल्या २२ लोकांची हवाई सिपाही पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.

लेखसंग्रह

भारतातील हवाई वाहतूकीची सुरूवात

Category:

 

भारतातील पहिले व्यावसायिक हवाई उड्डाण १८ फेब्रुवारी १९११ रोजी अलाहाबाद ते नैनी असे १० किलोमीटरचे होते. फ्रेंच नागरिक-मॉल्सियर पिकेट विमान चालक होता. पण मुलकी प्रवास सेवा १९१२ सालच्या डिसेंबर महिन्यात सुरू झाली. ती कराची ते दिल्ली अशी होती.

लेखसंग्रह

कॅस्केड ट्रीपिंग म्हणजे काय?

Category:

 

राज्यातील एखादे केंद्र काही दोषांमुळे बंद पडले तर ग्रीड पद्धतीमुळे दुसऱ्या केंद्रावर विजेची जास्तीची मागणी जाते कारण मागणी तशीच राहते. दुसऱ्या केंद्रावरील जनित्रांवर (जनरेटर) जास्त भार पडल्याने ते जनित्र बंद पडते.परत त्या मागणीचा भार तिसऱ्या केंद्राकडे जातो आणि तेथील जनित्र बंद पडते. अशा पद्धतीने राज्यातील केंद्रे एकामांगे एक बंद पडतात. यालाच कॅस्केड टीपिंग म्हणतात.

लेखसंग्रह

वीजनिर्मिती केंद्रांची क्षमता कशी मोजतात?

Category:

 

एखाद्या मोठ्या यंत्राने दहा लाख किलोग्रॅम म्हणजे एक हजार टन वजनाची वस्तू दहा सेंटीमीटर वर उचलण्यास लागणाऱ्या ऊर्जेची निर्मिती एका सेकंदात केली, तर त्या यंत्राची क्षमता दहा लाख वॅट म्हणजेच एक हजार किलोवॅट किंवा एक मेगावॅट इतकी भरेल. वीजनिर्मिती केंद्रांची क्षमता याच मेगावॅट या एककाद्वारे मोजली जाते.

लेखसंग्रह

वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक पद्धती

Category:

 

वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक पद्धतीत सौरऊर्जा, पवनऊर्जा, सागरीऊर्जा, भूऊर्जा इत्यादींचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो. यातील बहुतेक पद्धती या प्रदूषणापासून मुक्त आहेत.

लेखसंग्रह

वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रचलित पद्धती

Category:

 

आपली विजेची गरज ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, आपल्या मनगटावरच्या घड्याळातली विजेची गरज ही अत्यल्प असते व ती छोट्याशा बटण-सेलने भागू शकते. याउलट एखाद्या शहराला वीजपुरवठा करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करावी लागते. ही मोठ्या प्रमाणावरची विजेची निर्मिती मुख्यतः औष्णिक, जलविद्युत आणि अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे केली जाते.

लेखसंग्रह

वीजनिर्मितीसाठी भारतातील साधन-संपत्ती

Category:

 

आजच आपल्याला विजेचा तुटवडा भासत आहे. विकासाचा नियोजित दर राखायचा तर येत्या दहा वर्षांत भारतातलं विजेचं उत्पादन आजच्या तुलनेत दुप्पट, तर वीस वर्षांत चौपटीहून अधिक होणं गरजेचं आहे. विजेची ही प्रचंड गरज भागवण्यासाठी भविष्यात आपल्याला पारंपरिक पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहेच, पण त्याबरोबरच पवनऊर्जा, सौरऊर्जा, सागरीऊर्जा यासारख्या आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या अपारंपारिक स्रोतांकडेही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

लेखसंग्रह

भारतातील वीजनिर्मितीच्या विविध पद्धती

Category:

 

भारतात आज निर्माण होणाऱ्या एकूण वीजेपैकी मोठा भाग हा औष्णिक ऊर्जेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा आहे. औष्णिक पद्धतींनी निर्माण केल्या जाणाऱ्या वीजेचं प्रमाण हे एकूण वीज निर्मितीच्या 65 टक्के इतकं आहे. सुमारे 22 टक्के वीज ही जलविद्युत प्रकल्पांद्वारे तर 3 टक्के वीज ही अणुऊर्जेद्वारे निर्माण होते. उर्वरित 10 टक्के वीज ही पवनऊर्जा, सौरऊर्जा यासारख्या इतर अपारंपारिक स्रोतांद्वारे निर्माण होते.