लेखसंग्रह

लहानपणाचा ठेवा

Category:

 

गिरगावमधील समृद्ध आयुष्य अनुभवताना तिथल्या शाळांतून माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या तीन शाळा झाल्या. चिकित्सक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या कलागुणांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शाळेतल्या काळात नाटक पाहण्यासाठी वडिलांनी आवड लावली.

लेखसंग्रह

मिडिया इंडस्ट्रीची हाक

Category:

 

मुंबईच्या केसी कॉलेजमधून B.A.FTNMP पदवीधर. संगीत, वाचन, फोटोग्राफी, पर्यटन ह्यांची आवड. वयाच्या अठराव्या वर्षापासून झी, सोनी, कलर्स, अशा विविध चॅनल्सबरोबर प्रॉडक्शन युनिटमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले.

लेखसंग्रह

लहानपणाच्या सुखद संस्कारक्षम आठवणी

Category:

 

बहुतेक व्यक्तीचे जीवन वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं असतं. माझंही बालपण याला अपवाद नव्हतं. नाशिक जिल्ह्यातील दिण्डोरी गावात एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म दीपपूजा अमावास्येला झाला. आषाढी आमावस्या, खेड्यात तिला गटारी अमावस्या म्हणतात. माझा जन्म झाला त्यावेळी दिण्डोरी गाव पाच हजार लोकवस्तीचे खेडे होते. (इ. स. १९४७). गावात अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने राहत असत.

लेखसंग्रह

लहाणपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

Category:

 

बालपणाच्या रम्य आठवणीत रमायला कोणाला आवडणार नाही? मध्यंतरी एका शाळेत आरोग्य तपासणीसाठी जाण्याचा योग आला. तपासणीनंतर प्रश्नोत्तरा – दरम्यान काही उत्साही मुलांनी माझ्याच बालपणाविषयी प्रश्न विचारले तेव्हा मात्र माझे बालपण झरझर माझ्या डोळ्यांपुढे सरकू लागले.

लेखसंग्रह

अजाणतेपणातील वांडपणा

Category:

 

माझा अजाणतेपणाचा काळ सुखाचा होता की दु:खाचा याचा जमाखर्च मला नाही मांडता यायचा. पुन्हा सुख-दुःखाचे निकष व्यक्तिसापेक्ष आणि आपल्या भावनांचा कस कुणी ऐरणीवर घासून तपासतो का?

लेखसंग्रह

नदीबाई माय माझी..

Category:

 

परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो.

लेखसंग्रह

मी असा का? – महेश झगडे, I.A.S

Category:

 

मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन.

लेखसंग्रह

जबाबदारीच्या हजार वाटा..

Category:

 

समाजात वावरत असताना नेहमी म्हटल जात की, जसा पैशाकडे पैसा जातो आणि वाढतो, तशी जबाबदारी घेणाऱ्याकडे जबाबदारी जाते आणि वाढते. अशा वेळी तिचं ‘ओझं’ वाटतं. वेळप्रसंगी ‘एखादी जबाबदारी घेणं’ ही ‘क्रेडिटेबल गोष्ट’ वाटायला लागते, तर कधी ‘जबाबदारी घेण्याचं कौतुक होतं’ म्हणून जबाबदारी घ्यायला आवडते.

लेखसंग्रह

युवापिढी आणि वाचनसंस्कृती

Category:

 

तरूण पिढीला आपलं जीवन सुखासमाधानाचं आणि आनंदाचे व्हावे असे वाटत असेल, तर वाचनासारखा दुसरा पर्याय नाही. आज काळ बदलला आहे. बदलत्या काळाप्रमाणे अनेक सोई-सुविधा आपल्या सेवेला तत्पर आहेत. मग त्यांचा उपयोग आपल्या संपन्न, सुसंस्कृत जीवनासाठी का करायचा नाही?

लेखसंग्रह

द लास्ट सीन

Category:

 

The last seen…. हेच ते तीन शब्द… बारकाईने वाचल्यास लक्षात येईल की आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हाट्सअपचं एक अनमोल फीचर. हे ॲप तुम्ही शेवटचे केव्हा पाहिले त्याची नोंद दाखवणारं… पण हेच last seen जर पुस्तकांना लागू केलं तर काय असेल उत्तर…? 2 महिने…