अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ५१ – गुरुतत्व!

Category:

 

माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी…

अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ५० – शुभ असावा लोभ…

Category:

 

लोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा…

लेखसंग्रह

भज गोविन्दम् – भाग २ – चतुर्दशमंजरिका – चर्पटपंजरिका – मराठी अर्थासह

Category:

 

भज गोविंदम् स्तोत्राच्या या भागाला चर्पटपंजरिका असेही नाव आहे. ‘चर्पट’ चा अर्थ चिंधी किंवा लक्तर (कापडाचा तुकडा) असा आहे. आपण ब्रह्मपद रूपी शाश्वत सुखाच्या भरजरी वस्त्राऐवजी ऐहिक क्षणभंगुर सुखांच्या चिंध्यांच्या मागे लागतो आहोत अशा अर्थाने तो २२ व्या श्लोकात आला आहे.  

अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग ( स्थितप्रज्ञ)
लेखसंग्रह

अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग ( स्थितप्रज्ञ)

Category:

 

शरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.

लेखसंग्रह

भज गोविन्दम् – भाग १ – द्वादशमंजरिका – मराठी अर्थासह

Category:

 

‘भज गोविंदम्’ हे जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी रचलेले काव्य आहे. लौकिक अर्थाने हे कोण्या  देवतेचे स्तोत्र नसून ही एक छोटीशी रचना आहे. ताला सुरावर भजन म्हणून ते गायले गेले असले तरी त्यात वेदांताचे सार आहे आणि त्यात मनुष्याला एक विनवणी केली आहे की, विचार कर….

अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग
लेखसंग्रह

अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग

Category:

 

असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण?

अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ४८ – स्वभाव…

Category:

 

जर आपला स्वभाव चांगला असेल आणि लोकांना आकर्षित करणारा असेल, तर लोक आपल्याजवळ येण्यासाठी उत्सुक होतील, म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते, आवश्यक असतो तो आपला स्वभाव. जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो, अश्याच व्यक्तींना लोक आपलेसे करतात.

अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ४७ – आपल्या प्रत्येक देण्यामध्ये येणं हे आहेच

Category:

 

काय परिणाम होईल हे माहिती नसताना देखील, जेव्हा जयदीपने विश्वासाने स्वतःजवळ जे पण आले ते देण्याची तयारी ठेवली तेव्हाच त्याने त्या मोबद्ल्यात कितीतरी जास्त पटीने सुख मिळवले. जेव्हा आपण आपली मनस्थिती बदलतो तेव्हाच आपण आपल्या परिस्थितीत बदल घडवु शकतो.